BREAKING: भाजप आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाहाच्या चौकशीचे आदेश

BREAKING: भाजप आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाहाच्या चौकशीचे आदेश

विवाह सोहळ्यात 200 हून अधिक पाहुणे उपस्थित राहू नये, असा नियम आहे.

  • Share this:

पुणे, 22 डिसेंबर: भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते (BJP MLA Ram Satpute) यांच्या शाही विवाह सोहळ्याच्या चौकशीचे आदेश पुण्याचे पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे (Pune Police) यांनी दिले आहेत. आमदार राम सातपुते यांचा विवाह रविवारी झाला. त्यांच्या विवाह सोहळ्यात 200 पेक्षा जास्त लोक होते, असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आता चौकशी करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी (BJP Leader) आवर्जुन हजेरी लावली होती.

हेही वाचा...लहान मुलांना कोरोना लस देता येणार नाही - हे आहे कारण

राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) कमी झाला असला तरी दुसरी लाट येणार असल्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'दो गज की दूरी जरुरी', 'मास्क पेहनना जरूरी है' असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वारंवार सांगत आहेत. मात्र, भाजपच्याच नेत्यांना त्याचा विसर पडल्याचं आमदार राम सातपुते यांच्या विवाह सोहळ्याला जमलेल्या गर्दीवरून बोललं जात आहे.

विवाह सोहळ्यात 200 हून अधिक पाहुणे उपस्थित राहू नये, असा नियम आहे. मात्र, भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्यात गर्दी मावत नसल्याचं समोर आलं होतं. या विवाह सोहळ्यातील गर्दीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले होतं. यावरून भाजपवर टीकेची झोडही उठली आहे. आता हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेलं आहे. पुण्याचे पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.

या विवाह सोहळ्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील अशी खास मंडळी उपस्थित होते. पाहुणे तर दुरच पण नेते मंडळींकडूनही मास्क आणि शारीरिक अंतर या नियमांचं पालन झालं नसल्याचं समोर आलेल्या व्हिडिओतून स्पष्ट झालं होतं.

हेही वाचा...लसीकरण करण्याआधी लोकांच्या शंका दूर करा, डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांना आवाहन

कोरोनाबाबत सरकारनं जाहीर केलेल्या निर्बंधाचं या सोहळ्यात अजिबात पालन करण्यात आलं नसल्याची टीका देखील करण्यात आली होती. सर्वसामान्य लोकांना विवाह कार्यक्रमात 200 जणांनीच हजर राहायची मर्यादा आहे. कोरोनबाबतचा नियम राजकीय नेत्यांना वेगळा आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगळा आहे का? असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित झाला आहे..

Published by: Sandip Parolekar
First published: December 22, 2020, 9:58 PM IST

ताज्या बातम्या