चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर वाद, आता मुक्ता टिळक यांनी दिलं स्पष्टीकरण

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर वाद, आता मुक्ता टिळक यांनी दिलं स्पष्टीकरण

भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

  • Share this:

पुणे, 8 जानेवारी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय झालं आहे. याबाबत आता भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. चंद्रकांतदादांनी ब्राह्मण समाजाचा उल्लेख केला नसल्याचा दावा मुक्ता टिळक यांनी केला आहे.

'सिंधुदुर्ग येथे झालेल्या भव्य शेतकरी मेळाव्यात बोलताना काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नेमके काय बोलले याचा नीट अभ्यास करावा आणि मग दादांविरुद्ध आंदोलन करावे,' असा सल्ला भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी टीकाकारांना दिला आहे. 'चंद्रकांतदादांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लीम समाजालाही देशाच्या मुख्य प्रवाहात कसे सामावून घेतले याचा उल्लेख करताना वस्तुस्थिती मांडली ते म्हणाले की, आत्ताचे मुसलमान हे काही बाबराचे वंशज नाहीत. बाबर आला आणि गेला, तसंच आपल्याकडेही दाते गाडगीळ अशी आडनावे असलेले मुस्लीम आहेत ते मूळचे इथलेच - कोणीतरी आक्रमक आला आणि ते धर्मांतरित झाले, असा दादांच्या वक्तव्याचा अर्थ आहे,' असं म्हणत मुक्ता टिळक यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

'ब्राह्मण समाजाच्या मनात द्वेष पसरविण्याचा प्रकार निषेधार्ह'

चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा अन्वयार्थ काढायचा आणि निरर्थक वाद निर्माण करायचा याला एका सुनियोजित षडयंत्राचा वास येतो आहे, असंही मुक्ता टिळक यांनी म्हटलं आहे. 'चंद्रकांतदादा जे म्हणाले तो इतिहास असून या देशात आलेल्या परकीय आक्रमकांनी मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडविले व सध्याचे मुस्लीम बांधव हे त्याचेच वंश आहेत म्हणून अद्यापही आपल्याकडे इतर समाजातील अनेक तत्सम आडनावे मुस्लीम समाजात आढळतात असा त्यांच्या वक्तव्याचा साधा सरळ अर्थ आहे. मात्र या विषयाचे भांडवल करुन ब्राह्मण समाजाच्या मनात द्वेष पसरविण्याचा प्रकार निषेधार्ह आहे,' असं म्हणत मुक्ता टिळक यांनी टीकाकारांचा समाचार घेतला आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 8, 2021, 10:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading