राज ठाकरेंच्या 'महामोर्चा'साठी मनसे कार्यकर्त्यांना भाजप आमदाराने पुरवल्या गाड्या?

राज ठाकरेंच्या 'महामोर्चा'साठी मनसे कार्यकर्त्यांना भाजप आमदाराने पुरवल्या गाड्या?

मुंबईला जाण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना भाजप आमदाराने गाड्या पुरवल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

  • Share this:

पुणे, 9 फेब्रुवारी: महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी मनसेने मुंबईत आज (रविवार) महामोर्चा काढला. या मोर्चाचं नेतृत्त्व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं. या महामोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसे कार्यकर्ते मुंबईत पोहोचले आहेत. मुंबईला जाण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना भाजप आमदाराने गाड्या पुरवल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.महेश लांडगे असे या भाजप आमदाराचे नाव आहे.

भाजप आमदाराने दिलं असं स्पष्टीकरण..

पुण्यातील भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी मनसे कार्यकर्त्यांना वाहने पुरवल्याचा आरोप आहे. त्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार महेश लांडगे यांनी वाहन पुरवल्याच्या आरोपावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, 'माझा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. मी कंपन्यांना बस पुरवतो. आज रविवार असल्याने त्या गाड्या मनसेच्या कार्यकर्त्यांना दिल्या असतील. आम्हीसुद्धा भारतीय जनता पक्ष म्हणून सीएए आणि एनआरसीचे समर्थन करतो. त्या कार्यक्रमाला जाणारे कार्यकर्ते हे भाजपचे आहेत, की नाही हे मला माहीत नाही. पण, तिथे जाणारा माणूस हा सीएएलाच समर्थन करत आहे. देशाच्या हितासाठी देशाच्या बाजूने त्याचे मत व्यक्त करत आहे. मग तो चांगल्याच कार्यक्रमाला गेला आहे. त्या चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल, तर माझी त्याला हरकत नाही.'

...तर तलवारीला तलवारीने देऊ - राज ठाकरे

दरम्यान, एनआरसी आणि सीएए कायद्याचे जाहीर समर्थन देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उघडपणे मोर्चे काढणाऱ्यांना धमकी दिली. आम्ही मोर्चा मोर्चाने उत्तर दिलं आहे. नीट एकोप्याने राहा नाहीतर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल, अशा सज्जड इशाराही राज ठाकरेंनी यावेळी दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आझाद मैदानात महामोर्चा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना बाहेर हाकल्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. NRC आणि CAA कायद्यावरून राज ठाकरे यांनी विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना थेट धमकीच दिली आहे. 'माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे.'

First Published: Feb 9, 2020 05:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading