Home /News /pune /

‘महाराष्ट्रात रोज हाथरस घडत आहे, त्यावर गप्प का?’ भाजपचा गृहमंत्री देशमुखांवर निशाणा

‘महाराष्ट्रात रोज हाथरस घडत आहे, त्यावर गप्प का?’ भाजपचा गृहमंत्री देशमुखांवर निशाणा

'मुंबई पोलीस हे काही एका पक्षाचे नाहीत मुंबई पोलिसांची बदनामीची आम्हालाही काळजी आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे त्यावर लक्ष दया.'

पुणे 06 ऑक्टोबर: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपने आयटी सेलच्या माध्यमातून राज्याला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं काम केलं, असा आरोप देशमुख यांनी केला होता. गृहमंत्र्यांच्या या आरोपावर भाजपने पलटवार केला आहे. विधान परिषदेतले विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी देशमुखांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात रोज हाथरस घडत असताना त्यावर गृहमंत्र्यांना बोलायला वेळ नाही, ते गप्प का आहेत असा सवाल दरेकर यांनी केला आहे. दरेकर म्हणाले, अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत की एका पक्षाचे प्रवक्ते. अजून बाळंतिणीला बाळ झालं नाही,  पण बाळ व्हायच्या आधीच नाव ठेवायची घाई कशाला. मंत्री अब्दुल सत्तारांनी मराठा अरक्षणाविषयी प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला घरात घसून मारेल असा दम दिला होता, या प्रकरणाची चौकशी करून अब्दुल सत्तारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणीही त्यांनी केली. सुशांत सिंह प्रकरणाचे रोपोर्ट अजून यायचे आहेत. पूर्ण तपास झाल्याशिवाय बोलू नका असंही ते म्हणाले. ट्रोलिंग संदर्भात सर्वांचीच चौकशी करावी राजकारण करू नये. मुंबई पोलीस हे काही एका पक्षाचे नाहीत मुंबई पोलिसांची बदनामीची आम्हालाही काळजी आहे. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे त्यावर लक्ष दया असा सल्लाही त्यांनी दिला. अमर अकबर अँथनी ते हेरा फेरी..., हे आहेत विनोद खन्ना यांचे काही बेस्ट चित्रपट बिहारमधल्या घटनेवरून टीका करणाऱ्या देशमुखांनी गुप्तेश्वर पांडेंनी भाजप मध्ये प्रवेश केलाय का? याचं उत्तर द्यावं असंही ते म्हणाले. अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत अनेक तक्रारी आहेत. मुंबई वैद्यापीठात गोंधळ सुरू आहे. त्याची जबाबदारी सरकारने स्वीकारावी. विद्यार्थ्यांच नुकसान होऊ देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली. काय म्हणाले होते अनिल देशमुख? राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांनी बदनामी करणाऱ्या भाजप नेत्यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. तसंच, भाजपच्या आयटी सेलने या प्रकरणात फेक अकाऊंट काढल्याचा आरोपही त्यांनी केला. अनिल देशमुख यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन सुशांत सिंह प्रकरणावरून भाजपवर सडकून टीका केली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’: मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांची झाली आरोग्य तपासणी 'सुशांत सिंह प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट काय आहे, याची वाट आम्ही पाहत आहेत.  रिपोर्ट लवकर जाहीर करावा, त्यामुळे हत्या आत्महत्या होती हे स्पष्ट होईल', असं अनिल देशमुख म्हणाले.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Anil deshmukh, Pravin darekar

पुढील बातम्या