मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

संजय राऊतांची बॉडी लँग्वेज आत्मविश्वास हरवलेली, प्रवीण दरेकरांनी केला पलटवार

संजय राऊतांची बॉडी लँग्वेज आत्मविश्वास हरवलेली, प्रवीण दरेकरांनी केला पलटवार

भगव्याचं पेटंट केवळ शिवसेनेला दिलंय का?

भगव्याचं पेटंट केवळ शिवसेनेला दिलंय का?

भगव्याचं पेटंट केवळ शिवसेनेला दिलंय का?

पुणे, 19 नोव्हेंबर: शिवसेनेचं (Shiv sena) मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून मंदिरं उघडण्याच्या श्रेयवादावरून भाजप (BJP) नेत्यांना सणसणीत टोला लगावला. भारतीय जनता पक्षाला नक्की काय झाले आहे? महाराष्ट्रातील (Maharashtra) त्या पक्षाचे डोके सरकले आहे का? असे अनेक प्रश्न मराठी जनतेला पडत आहेत. भाजपातील 'उपऱ्यां'नी विजयोत्सव साजरा केला आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे. त्याला भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भगव्याचं पेटंट शिवसेनेला दिलंय का? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची बॉडी लँग्वेज आत्मविश्वास हरवलेली आहे, अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी खोचक टीका केली आहे. 'सामना' हे काही दिशा देणारं दैनिक नाही, असंही ते यावेळी म्हणाले. हेही वाचा...भाजप खासदार रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली, हे कारण आलं समोर प्रवीण दरेकर हे पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी आज पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवर कडाडून टीका केली. ठाकरे सरकारमध्ये कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही. राज्यातील लोकांचा आघाडी सरकारवर विश्वास उडाला आहे. सरकारनं वीज बील माफीचं आश्वासन पाळलं नाही. वीज खातं काँग्रेसकडे असल्याने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. काँग्रेसला जनतेच्या नजरेतून उतरवण्याचं काम शिवसेना, राष्ट्रवादीकडून केलं जात असल्याचा दावा दरेकरांनी यावेळी केला. वीज बिल माफीचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांकडे पडून आहे. मग त्यावर कार्यवाही का नाही? असा सवाल दरेकरांनी सरकारला केला आहे. सरकारनं ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळल आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार असा प्रचार करता, आम्ही काही मेलेल्या आईचं दूध पिलं नाही, असा इशारा देखील दरेकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. भाजप मिशन मुंबई यशस्वी करणारच... हिंदुत्त्वाचा भगवा कोणाच्या हाती द्यायचा हे मुंबईकरच मनपा निवडणुकीत ठरवतील. भगव्याचं पेटंट शिवसेनेला दिलंय का? असा सवाल करत प्रवीण दरेकर यांनी शिलसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पदवीधरांमध्ये आमचं नेटवर्क मोठं... पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख मैदानात आहेत. संग्राम देशमुख नक्कीच निवडून येतील. पदवीधरांमध्ये आमचं नेटवर्क मोठं आहे, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला. बिहारमध्ये पदवीधर मतदारांनीच भाजपच्या विजयात मोठा हातभार लावला असल्याचं दरेकरांनी यावेळी सांगितलं. शिक्षक मतदारसंघात आमचा जितेंद्र पवार यांना पाठिंबा आहे. हेही वाचा...भाजप आमदारासह 15 जणांवर फसवणुकीचा गुन्हा,15 कोटी 75 लाखांचा अपहार केल्याचा आरोप पदवीधरांचे अनेक प्रश्न आम्ही मांडत आहे. आमच्या उमेदवाराचा नक्कीच विजय होईल. त्यात पुणेकर मतदार सजग आहेत.  या सरकारकडून शिक्षण क्षेत्रात गोंधळ घातला जात आहे. परीक्षा, प्रवेश प्रक्रियेचं काहीच नियोजन नाही, अशी टीका दरेकरांनी केली.
First published:

Tags: BJP, Maharashtra, Pravin darekar, Sanjay raut, Shiv sena

पुढील बातम्या