...आणि देवेंद्र फडणवीस थेट चिखलातून निघाले चालत, पाहा हा VIDEO

...आणि देवेंद्र फडणवीस थेट चिखलातून निघाले चालत, पाहा हा VIDEO

'केंद्र सरकार हे मदत करणारच आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. पण, राज्य सरकारने हात झटकले नाही पाहिजे'

  • Share this:

पुणे, 19 ऑक्टोबर : कोरोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर अस्मानी संकट कोसळले आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पिकं हे पाण्यात गेले आहे.  शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राजकीय नेते बांधावर पोहोचले आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बारामतीपासून दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांचा दौऱ्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

देवेंद्र फडणवीस हे दुपारी 12 च्या सुमारास  पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पोहोचले होते. या गावात परतीच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रस्तेच्या रस्ते पाण्याखाली गेले आहे.  स्वामी चिंचेला गावात देवेंद्र फडणवीस यांनी चिखलातून वाट काढत खचलेला रस्ता पार केला आहे. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला आणि समस्या जाणून घेतल्या.

स्वामी चिंचोली येथे रस्ता पूर्णपणे खचला आहे. त्याचबरोबर घरांचे नुकसान सुद्धा मोठे आहे. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे, असे यावेळी फडणवीस म्हणाले.

मळदगाव इथे पोहोचल्यावर तर संपूर्ण पूलचं खचलेला होता. त्यामुळे फडणवीस यांना पुलाच्या अलीकडेच थांबावे लागले होते. तर पुलाच्या दुसऱ्या बाजूला गावकरी थांबले होते. यावेळी ओढाच्या पलीकडे असलेल्या लोकांशी फडणवीसांनी मोठ्याने बोलून संवाद साधला आहे.

केंद्र सरकार हे मदत करणारच आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. पण, राज्य सरकारने हात झटकले नाही पाहिजे. राज्य सरकारने तातडीने भरीव आर्थिक मदत घोषित केली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आज  पुणे आणि सोलापूरचा दौरा केला. विशेष म्हणजे,  बारामतीपासून सुरुवात करुन कुरकुंभ, इंदापूर, टेंभुर्णी, करमाळा, परांडा या ठिकाणी पाहणी करुन उस्मानाबादकडे रवाना होणार आहे. त्यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही सोबत आहे.

Published by: sachin Salve
First published: October 19, 2020, 4:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या