• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • धनंजय मुंडेंच्या आरोपावर फडणवीसांचा पलटवार, पार्थ पवारांबद्दलच्या प्रश्नालाही पुन्हा दिलं उत्तर

धनंजय मुंडेंच्या आरोपावर फडणवीसांचा पलटवार, पार्थ पवारांबद्दलच्या प्रश्नालाही पुन्हा दिलं उत्तर

फाईल फोटो

फाईल फोटो

फडणवीस यांनी राज्यात कोरोनाची स्थिती, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आणि पार्थ पवार यांची नाराजी अशा विषयांवर भाष्य केलं आहे.

  • Share this:
पुणे, 15 ऑगस्ट : भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पुण्यात मराठी पत्रकार संघ कोविड सेंटरच्या उद्घाटनाला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आणि पार्थ पवार यांची नाराजी अशा विषयांवर भाष्य केलं आहे. 'देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत प्रकरणात केलेली सीबीआय चौकशीची मागणी आणि त्यानंतर त्यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रभारीपदी झालेली निवड, हा योगायोग आहे,' अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'सुशांत केस आणि माझ्या बिहार नियुक्तीचा संबंध नाही. सुशांत प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांवर राजकीय दबाव आहे. एरवी महाराष्ट्र पोलिसांचं काम चांगलं आहे, पण सुशात केसमध्ये त्यांच्यावर राजकीय दबाव आहे.' दुसरीकडे यावेळी देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांच्याबद्दलच्या वादाविषयी देखील प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी राजकीय भाष्य करणं टाळलं आहे. 'पार्थ पवारांचा विषय हा पवारांचा कौंटुबिक विषय आहे, त्यात आम्हाला पडायचं नाही,' असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या संवादातील ठळक मुद्दे: - कोरोनाच्या या महामारीत आपण एका विचित्र परिस्थितीतून जातोय - आता कोरोनाची भीती कमी झाली असली संकट कायम आहे, लस येईपर्यंत काळजी घेतलीच पाहिजे - पत्रकारांसाठी कोविड सेंटर हा चांगला उपक्रम, पत्रकार पहिल्या दिवसापासून फिल्डवर आहेत... कोरोना बाधित पत्रकारांना उपचार मिळालेच पाहिजेत - महाराष्ट्र हा कोरोनाची राजधानी झालाय, मृत्यूचं प्रमाण जास्त - ऑक्सिजन बेड्स वाढवा, पुण्यात पीटी पीसीआर टेस्ट वाढवाव्यात - संसर्गाचे प्रमाण कमी केले पाहिजे - एन्टीजेन टेस्टची रिलायबिलिटी फारशी चांगली नाही... आरटीपीसीआर टेस्ट वाढवल्या पाहिजेत - पुण्यात टेस्टिंगचं प्रमाण खूप चांगलं आहे, पेशंट्स लवकर डिटेक्ट होत आहेत
Published by:Akshay Shitole
First published: