मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'तेव्हा' तर लपून बसला होता आणि आता.., चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला

'तेव्हा' तर लपून बसला होता आणि आता.., चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला

भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

पुणे, 8 जानेवारी :  भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी आधी स्वत: पालकमंत्री असताना पुण्यात काय कामं झालीत ती बघावीत आणि नंतर मला बोलावं. दुसऱ्याला टपली मारल्याशिवाय अजित पवारांचा विषय संपत नाही. त्यांना पेलावत नाही त्यामुळे पवार कुटुंबीय सारखा मला चिमटा काढत असते, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

चंद्रकातं पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.  अजित पवार यांनी आधी स्वत: पालकमंत्री असताना पुण्यात काय कामं झालीत ती बघावीत आणि नंतर मला बोलावं. दुसऱ्याला टपली मारल्याशिवाय अजित पवारांचा विषय संपत नाही. त्यांना पेलावत नाही त्यामुळे पवार कुटुंबीय सारखा मला चिमटा काढत असते, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : औरंगजेबजी म्हणालो पण...,चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्रक काढून दिलं स्पष्टीकरण

'राजकारणासाठी अचारसंहिता'  

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, वेगवेगळ्या पक्षातील टॉपरची निवड करण्यात यावी, या दहा, बारा जणांनी मिळून महाराष्ट्राच्या राजकारणावर आचारसंहिता लिहिली पाहिजे. ती अजित पवार यांना पण लागू होईल. तेव्हा तर तुम्ही चार दिवस घरात लपून बसला होता, त्यामुळे दुसऱ्यावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो आहोत यांची जाणीव ठेवली पाहिजे. एकोमेंकांना आदर दिला पाहिजे, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

First published:

Tags: Ajit pawar, BJP, Chandrakant patil, NCP, Pune, Sharad Pawar