मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

चंद्रकांतदादांनी शिवसेनेला शिताफीनं टाळलं, पण शरद पवारांवर केला चतुराईनं पलटवार

चंद्रकांतदादांनी शिवसेनेला शिताफीनं टाळलं, पण शरद पवारांवर केला चतुराईनं पलटवार

केंद्र सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला

केंद्र सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला

केंद्र सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला

  • Published by:  Sandip Parolekar

पुणे, 6 डिसेंबर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी 'हिमालयात जावं' या शिवसेनेच्या (Shiv Sena) सल्ल्यावर खुद्द चंद्रकांत पाटलांनी उत्तर देणं शिताफीनं टाळलं. पण चंद्रकांत पाटील हे विनोदी विधाने करतात, या शरद पवारांच्या (Sharad Pawar) टीकेला आणि त्यांच्या वाचळवीरांनी बडबड बंद करावी, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी चतुराईनं पलटवार केला.

चंद्रकांत पाटील पुण्यात बोलत होतं. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या विरुद्ध दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोनल करत आहेत. मात्र, केंद्र सरकारचा कृषी कायदा (farm act-2020) रद्द होणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना ठणकावून सांगितलं..

हेही वाचा..शोककळा! साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून गावाकडे परतणाऱ्या दोघांवर काळाची झळप

केंद्र सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला शरद पवारांनी दिला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आंदराजंली अर्पण केली. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेचा गाभा 1000 वर्षे बदलता येणार नाही असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी आंदोलन दिल्ली पुरतं सीमित राहणार नाही. ते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले. शेतकऱ्यांना एमएसपी देणारच आणि इतके दिवस ते ऑन पेपर नव्हतं. आता ऑन पेपर येणार आहे. शेतमाल कुठंही विकता येणार तरी आंदोलनाचा आग्रह कशासाठी असा सवाल चंद्रकांत दादांनी केला. गेल्यावर्षी कांदा दुप्पट निर्यात झाला. यंदा पावसामुळे उत्पादन कमी झालं. तेलबिया निर्मितीही कमी झाली. हे कांदा निर्यात बंदी, पाम तेल आयातीवर टीका करणारे का सांगत नाहीत, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टीकेला प्रत्युत्तर दिलं.

दुसरीकडे, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधातदिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणाच्या हजारो शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनात शिवसेनाही रस्त्यावर उतरण्याची चिन्ह दिसत आहे. अकाली दलाच्या नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

शिवसेनेनंही या आंदोलनात पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी आज वर्षा येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अकाली दलाच्या नेत्यांनी आंदोलनाबद्दल माहिती दिली. तसंच या आंदोलनात शिवसेनेनंही सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अकाली दलाच्या नेत्यांना आश्वासन देत पुढील दोन आठवड्यात दिल्लीला येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील इतर दोन पक्षांनी देखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

हेही वाचा..देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही लक्षात आलं व्हिजन

शरद पवार घेणार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

कृषी कायदा रद्द करण्यासाठी आता शरद पवार यांनीही पुढाकार घेतला आहे. पुढील दोन दिवसांत शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

शरद पवार यांच्यासह काही नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी दिल्लीत भेट घेणार आहे. ही भेट कृषी कायदा विरोधाच्या संदर्भात असणार आहे. कृषी कायद्याविरोधात शरद पवार हे राष्ट्रपतींकडे नवी भूमिका मांडणार असल्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Chandrakant patil, Pune, Sharad pawar, Shiv sena