मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

राष्ट्रवादी हा झोपेत चालणारा पक्ष, चंद्रकांत पाटलांनी नवाब मलिकांना फटकारलं

राष्ट्रवादी हा झोपेत चालणारा पक्ष, चंद्रकांत पाटलांनी नवाब मलिकांना फटकारलं

दुर्दैवानं छत्रपतींचा वारसा सांगणारे व जाणता राजाचे उपमा देणारे झोपलेत का?

दुर्दैवानं छत्रपतींचा वारसा सांगणारे व जाणता राजाचे उपमा देणारे झोपलेत का?

दुर्दैवानं छत्रपतींचा वारसा सांगणारे व जाणता राजाचे उपमा देणारे झोपलेत का?

पुणे, 19 नोव्हेंबर: शरद पवारांचा (NCP Chief Sharad Pawar) राष्ट्रवादी कॉग्रेस (NCP) हा झोपेत चालणारा पक्ष आहे. छत्रपतींच्या राज्यात आपल्या हक्कासाठी आंदोलन करावे लागत नव्हते. मात्र दुर्दैवानं छत्रपतींचा वारसा सांगणारे व जाणता राजाचे उपमा देणारे झोपलेत का, झोपेचे सोंग घेतले आहे? त्यांना झोपेमध्ये स्वप्न पडतात. त्यांना फुकटची मिळालेली सत्ता आहे. नाही ते आरोप करुन डोक्यात जाऊ देऊ नका, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (BJP Leader Chandrakant Patil) राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांना फटकारलं आहे. तुम्ही जर नम्रपणे वागलात तर सर्व गोष्टी मार्गी लागतील महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संस्कृतीमध्ये मुंगी होऊन साखर खायची असते. अशा प्रकारे टक्के-टोमणे आणि मिस्कील टिप्पणी करत  कडक शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना प्रतिउत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला लक्ष केले. दरम्यान, भाजप हा हवेवर चालणारा पक्ष, अशी टीका नवाब मलिक यांनी दुपारी केली होती. हेही वाचा...येत्या 48 तासांत महाराष्ट्राच्या 'या' काही भागात अवकाळी पावसाची शक्यता चंद्रकांत पाटील हे राजगुरुनगर येथील पदवीधर मेळाव्यादरम्यान माध्यमाशी बोलत होते.नाचता येईना अंगण वाकडं अशी सरकारची अवस्था असल्याचा टोमणा ही त्यांनी यावेळी दिला. राज्यातील वाढीव वीज बिलाबाबत आरोप प्रत्यारोप होत असताना चंद्रकांत पाटील म्हणाले राज्यातील लोकांना वाढीव आलेली वीज बीले भरावी का? 600 रुपयांचे बील 6 हजार आले,700 रुपयांचे वीज बील 21 हजार आले आहे हि वील बीले लोकांनी भरावी का..आणि तुम्ही म्हणता वीज बीलांचे निर्णय आधीच्या सरकारने केलेय मग आधीच्या सरकारने केले मग आता सरकार तुम्ही डोक्यावर घेतले कशाला. मागच्या सरकारने पाहिले असते असं म्हणत आमच्यात धमक आहे आम्ही सक्षमपणे निर्णय घेतले असते नाचता येईना अंगण वाकडं अशा शब्दात सरकारला चिमटा काढत वीज बिलाबाबत सरकारला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांनी लक्ष केले. मागच्या सरकारच्या काळात महावितरण फायद्यात चालले होते त्यावेळी महावितरणने इनकम टँक्स भरला आहे. आता राज्य सरकारला वीज बिलाबाबत लोकांना न्याय देता येत नाही आणि भाजपावर आरोप केले जात आहे. वीज बिलाबाबत सोमवार पासुन प्रखरेने मोठे आंदोलन उभे करणार आहे. हेही वाचा..कोरोनामुळे स्थगित केलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांबाबत आयोगानं केली मोठी घोषणा राज्यात वीज बिलाबाबत मनसे आक्रमकतेने आंदोलन करत आहे. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी सरकारच्या विरोधातील भुमिका मात्र एक असून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून झोपलेल्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगत आंदोलनाचे हत्यार मोठ्या ताकदीने उभे करणार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी सांगितले.
First published:

Tags: Chandrakant patil, NCP, Pune, Sharad pawar

पुढील बातम्या