'चंपा'वरून युद्ध पेटलं, भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार

'चंपा'वरून युद्ध पेटलं, भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार

'भाजपचा दादा तुमच्या गडातच एक दिवस बारामतीतच तुम्हाला लोळवेल.'

  • Share this:

मुंबई 14 ऑक्टोंबर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवरून भाजपने राज ठाकरे आणि अजित पवारांवर पलटवार केलाय. राज ठाकरे आणि अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना 'चंपा' असं म्हणत टीका केली होती. या टीकेवरून भाजपचे नेते आशीष शेलार यांनी राज ठाकरे आणि अजित पवारांवर जोरदार टीका केलीय. तुमचा सुंभ जळाला तरी पिळ जात नाही अजुनही तुम्ही चंपा बोलण्याचत धन्यता मानता का? असा सवाल त्यांनी या दोनही नेत्यांना केलाय. त्यामुळे प्रचाराच्या राहिलेल्या शेवटच्या दिवसांमध्ये 'चंपा'वरून युद्ध पेटण्याची शक्यता आहे.

मुलासाठी वाट्टेल ते, आईजवळून सहा दिवसाचं मूल चोरलं आणि मुलीला आणून ठेवलं

राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर अजित पवारही त्यांच्यावर 'चंपा'असं संबोधत टीका करत असतात. या दोनही नेत्यांना आशीष शेलार यांनी ट्विटरवरून शालजोडीतले हाणले आहेत. ते म्हणाले, सुंभ जळलं तरी पिळ नाही जळत, चंपा बोलण्यात धन्यता मानता?

धरणाचे पाणी तुमची पाठ नाही सोडत! अजुनही दर्प येतोय बारामतीला सत्तेच्या मस्तीचा. आमचा दादा कोल्हापूरकर,पण संयमी संघ शिस्तीचा. भाजपचा दादा तुमच्या गडातच तुम्हाला घोळवेल. साधा स्वयंसेवक एक दिवस बारामतीतच तुम्हाला लोळवेल.

स्मृती इराणी आपल्या भावावर का 'जळतात', त्यांनीच केला हा खुलासा!

काय म्हणाले राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (14 ऑक्टोबर) मनसेचे उमेदवार अजय शिंदे यांच्या प्रचारासाठी कसबा येथे जाहीर सभा घेतली. राज ठाकरे यांची ही पुण्यातील पहिली सभा होती. या सभेमध्ये राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. 'महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती असताना सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान काय झालं? तर कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आला. मनसेचा उमेदवार (अजय शिंदे) या चंपाची चंपी करणार', अशा शब्दांत राज यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

नारायण राणे यांनी जाहीर केली 'शिवसेने'वर आतापर्यंतची सर्वात मोठी भूमिका

मनसे उमेदवार करणार 'चंपा'ची चंपी - राज 

राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होताच सभेसाठी जमलेल्या नागरिकांनी मोठमोठ्या आवाजात चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा उल्लेख करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस राज यांनी 'काय बोलत आहात? असा प्रश्न विचारातच जनतेमधून 'चंपा' असं उत्तर आलं. राज यांनीही 'चंपा' म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पुणेकर नावं ठेवण्यात पटाईत आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला हाणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 09:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading