मराठी बातम्या /बातम्या /पुणे /प्रणिती शिंदेंनी राज ठाकरेंना डिवचलं, हिंदी डायलॉग म्हणत उडवली खिल्ली

प्रणिती शिंदेंनी राज ठाकरेंना डिवचलं, हिंदी डायलॉग म्हणत उडवली खिल्ली

 राहुल गांधी यांना अटक केली गेली तर आम्ही जेल भरो आंदोलन करणार

राहुल गांधी यांना अटक केली गेली तर आम्ही जेल भरो आंदोलन करणार

राज्यातील कायदा व्यवस्था बिघडविण्यासाठी भाजप राज ठाकरेंचा वापर करत आहे, असा आरोप देखील शिंदे यांनी केला.

पिंपरी चिंचवड, 31 मार्च : 'जो गरजते है बरसते नही' राज ठाकरे भाजपची B टीम आहे. त्यांना सोबत घेऊन राज्यात दंगली घडविण्याचे भाजपचा प्रयत्न आहे, असं म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधीच्या समर्थनार्थ आज पिंपरी चिंचवडमध्ये स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात केली.

पिंपरी चिंचवडमधील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरवली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

'जो गरजते है ओ बरसते नही. राज ठाकरे भाजपची B टीम आहे. त्यांना सोबत घेऊन राज्यात दंगली घडविण्याचे भाजपचा प्रयत्न आहे, अशी खोचक टीका करत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचलं आहे.

(राजकारणातली मोठी बातमी, शिवसेनेचे मंत्री पोहोचले शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर)

राज्यातील कायदा व्यवस्था बिघडविण्यासाठी भाजप राज ठाकरेंचा वापर करत आहे, असा आरोप देखील शिंदे यांनी केला.

((भावी मुख्यमंत्री अजितदादा.. बॅनर पाहून जितेंद्र आव्हाड म्हणतात, निवडणुका लागुद्या मग..)

दरम्यान, राहुल गांधी यांना अटक केली गेली तर आम्ही जेल भरो आंदोलन करणार असल्याचंही शिंदे म्हणाल्या तर, शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्याबाबत राहुल गांधी सकारात्मक विचार करतील मात्र सावरकरांबाबत काँग्रेसची भूमिका बदलणार नाही, असं प्रणिती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला.

First published:
top videos