मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune Municipal Election 2022 : पुण्यात राष्ट्रवादीने नारळ फोडलं, भाजपच्या बालेकिल्ल्यातील मोठी खेळी, 25 नगरसेवकांना फोडण्याचा संकल्प

Pune Municipal Election 2022 : पुण्यात राष्ट्रवादीने नारळ फोडलं, भाजपच्या बालेकिल्ल्यातील मोठी खेळी, 25 नगरसेवकांना फोडण्याचा संकल्प

पुण्यातील वडगाव शेरी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पण याच बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीचं नारळ फोडलं आहे.

पुण्यातील वडगाव शेरी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पण याच बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीचं नारळ फोडलं आहे.

पुण्यातील वडगाव शेरी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पण याच बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीचं नारळ फोडलं आहे.

पुणे, 5 फेब्रुवारी: पुण्यात महापालिका निवडणुकीचं (Pune Municipal Election 2022) बिगूल वाजलं नसलं तरी राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील वडगाव शेरी (Wadgaon Sheri) हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला मानला जातो. पण याच बालेकिल्ल्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीचं नारळ फोडलं आहे. वडगाव शेरीतील भाजप नगरसेविका शितल सावंत (Shital Sawant) यांचे पती अजय सावंत (Ajay Sawant) यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे (NCP MLA Sunil Tingre) यांनी भाजपचे तब्बल 25 नगरसेवक राष्ट्रवादीत घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे. वडगाव शेरीनंतर चाकण (Chakan) येथील तीन नगरसेवकांनीदेखील भाजपचा सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतराच्या वेगवान निघालेल्या या गाडीला भाजप कसं रोखतं आणि प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे अजय सावंत यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे माजी खासदार संजय काकडे यांचे समर्थक म्हणून अजय सावंत यांना ओळखलं जातं. अजय सावंत यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी नगरसेविका शितल सावंत यादेखील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वडगाव शेरीतल्या राजकारणाविषयी बोलायचं झालं तर या विधानसभा मतदारसंघात 18 नगरसेवक येतात. विशेष म्हणजे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा झटका दिला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील टिंगरे निवडून आले. त्यामुळे साहजिकच तिथली बरीचसी राजकीय खेळी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आली. वडगाव शेरीत आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असल्याने महापालिका निवडणुकीत त्या मतदारसंघात राष्ट्रवादीला चांगला फायदा मिळू शकतो. कारण आमदार सुनील टिंगरे देखील 25 नगरसेवकांना फोडायची भाषा करत आहेत. हा भाजपसाठी मोठा इशारा आहे. (जन्मापासून महिलेला येत नव्हता कशाचाच वास; कोरोनाची लागण होताच झाला मोठा चमत्कार) दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज ज्यांनी प्रवेश केला ते अजय सावंत यांचं राष्ट्रवादी काँग्रेससोबतचं जुनं नातं आहे. त्यांच्या वॉर्डमध्ये ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्या वॉर्डमध्ये ते किंवा त्यांची पत्नी निवडून येणं ही सामान्य बाब मानली जाते. अर्थात विरोधकांचं आव्हान असतंच. पण तरीही निवडणुकीत बाजी मारण्याचं कौशल्य किंवा राजकीय डावपेच लढवण्याचं कौशल्य सगळ्यांकडेच असतं, असं नाही. अजय सावंत यांच्या पत्नी गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. त्याआधी अजय आणि त्यांच्या पत्नी शितल या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पण त्यावेळच्या एकंदरीत वातावरणात त्यांनी भाजपची साथ पकडली होती. पण तरीही देर आए दुरुस्त आहे, सावंत कुटुंबाने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.
First published:

Tags: Muncipal corporation, NCP, Pune, Pune Muncipal corporation

पुढील बातम्या