मराठी बातम्या /बातम्या /पुणे /भाजप नगरसेवकाची अरेरावी, महिला आरोग्य अधिकाऱ्यावर गेला धावून; वैशाली जाधव यांना कोसळले रडू, ऑडिओ व्हायरल

भाजप नगरसेवकाची अरेरावी, महिला आरोग्य अधिकाऱ्यावर गेला धावून; वैशाली जाधव यांना कोसळले रडू, ऑडिओ व्हायरल

वैशाली जाधव यांच्या घरातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीही वैशाली जाधव या कामावर हजर होत्या.

वैशाली जाधव यांच्या घरातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीही वैशाली जाधव या कामावर हजर होत्या.

वैशाली जाधव यांच्या घरातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीही वैशाली जाधव या कामावर हजर होत्या.

पुणे, 29 एप्रिल : राज्यात कोरोनाची (Corona) दुसरी लाट आली आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून काम करत आहे. आरोग्य सेवकांच्या कामाचे कौतुक होत आहे. पण अशा या नाजूक परिस्थितीत पुण्यातील भाजप नगरसेवक धनराज घोगरे ()bjp corporator dhanraj ghogare)  हे सहायक आरोग्य महिला अधिकाऱ्यावरच धावून गेल्याची घटना घडली आहे. धनराज घोगरे यांनी अरेरावी केल्यामुळे महिल्या अधिकाऱ्याला रडू कोसळले आहे. या घटनेचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.

पुण्यातील वानवडी भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे नवीन लसीकरण केंद्राच्या परवानगीबाबत विचारणा केली होती. याबद्दल ते पाठपुरावा करण्यासाठी वैशाली जाधव यांच्याकडे गेले होते. त्यावेळी

धनराज घोगरे आणि डॉ. वैशाली जाधव यांच्यात नवीन लसीकरण केंद्राच्या परवानगीवरून आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्या दालनातच प्रचंड वाद झाला. यावेळी नगरसेवक घोगरे यांनी महिला डॉ. वैशाली जाधव यांच्यावर अरेरावी केली.

'दहा तास तुमचा मोबाईल बंद आहे, तुम्ही नीट काम करत नाही. दोन दिवस झाले तुमच्याकडे कागद मागत आहे. घरचे काम असल्यासारखे करत आहात, हे तुमच्या घरचे काम नाही, आयता पगार घेता तुम्ही' असं धनराज घोगरे यांनी वैशाली जाधव यांना म्हणत असल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये समोर आलं आहे.

वैशाली जाधव यांनी 'आपण एका महिला अधिकाऱ्याशी बोलताय, तुम्ही कसं बोलताय ते आधी पाहा, आम्ही काही घरची काम करत नाही. गेल्या वर्षभरापासून इथं काम करतोय' असं म्हणत असताना रडू कोसळले आणि त्यांचा संताप अनावर झाला. वैशाली जाधव यांच्या घरातील चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीही वैशाली जाधव या कामावर हजर होत्या.

कसा झाला लोकप्रिय अभिनेता?; पाहा सिद्धांत चर्तुवेदीचा प्रवास

डॉ. वैशाली जाधव या लसीकरण विभागाच्या प्रमुख आहेत. दहा दिवसांपूर्वीच लसीकरणाचा चार्ज डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे सोपवला गेला आहे. प्रत्येक नगरसेवकाला स्वत:च्या वार्डात लसीकरण केंद्र हवे आहे. त्यातूनच हा प्रकार घडला आहे. परंतु,  नगरसेवकाच्या अशा  दमदाटीमुळे अधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  नगरसेवक घोगरे यांच्या  दमदाटीमुळे डॉक्टरांनी काम बंदचा पवित्रा घेतला होता.

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मोठी घडामोड, अखेर श्रीनिवास रेड्डीला अटक

दरम्यान, हा प्रकार अत्यंत निंदनीय आणि लाजीरवाणा आहे. वैशाली जाधव यांनी कोरोनाच्या काळात अत्यंत उत्तम काम केले आहे. भाजप नगरसेवकाने त्यांच्या अंगावर धावून जाणे हा अत्यंत लाजीरवाणा प्रकार आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर  प्रशांत जगताप यांनी केली आहे. ही घटना घडल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी 2 तास अधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात आली होती. जर तुमच्या पक्षाचा नगरसेवक अधिकाऱ्यांवर अशी मुजोरी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही प्रशांत जगताप यांनी सत्ताधारी भाजपकडे केली.

First published: