• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • VIDEO: पुण्यात रिक्षावर कोसळलं भलंमोठं झाड; अग्निशमन दलाच्या जवानामुळे वृद्ध चालकाचे वाचले प्राण

VIDEO: पुण्यात रिक्षावर कोसळलं भलंमोठं झाड; अग्निशमन दलाच्या जवानामुळे वृद्ध चालकाचे वाचले प्राण

Viral Video: वादळी वाऱ्यामुळे पुण्यातील रास्ता पेठेतील केईएम रुग्णालयासमोरील भलं मोठं झाड रिक्षाचालकाच्या अंगावर कोसळलं आहे. अग्निशमन दलाचे जवान वेळेत आल्यानं संबंधित रिक्षाचालकाचा जीव वाचला आहे.

 • Share this:
  पुणे, 23 जुलै: मागील काही दिवसांपासून पुण्यासह (Pune) पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण (Konkan) परिसराला पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. जोरदार पावसासोबत वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना समोर येत आहे. मुंबईतील विक्रोळी आणि चेंबूर येथील घटना ताजी असताना, महाड परिसरात भूस्खलन होऊन मोठी जीवितहानी झाली आहे. यानंतर पुण्यात देखील एक भलंमोठं झाडं कोसळल्याची घटना समोर आली आहे. वादळी वाऱ्यामुळे पुण्यातील रास्ता पेठेतील केईएम रुग्णालयासमोरील भलं मोठं झाड रिक्षाचालकाच्या अंगावर कोसळलं आहे. अचानक रिक्षावर हे झाड पडल्यानं रिक्षाचालकही रिक्षात अडकून पडला होता. दरम्यान परिसरातील लोकांनी तातडीनं या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत रिक्षाचालकाचा जीव वाचवला आहे. हेही वाचा-पुणे भिमाशंकर मंदिराला पाण्याचा वेढा; इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग पाण्यात एवढं मोठं झाड रिक्षावर कोसळूनही वयोवृद्ध रिक्षाचालक बचावल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या दुर्दैवी अपघातात रिक्षाचं बरंच नुकसान झालं असून रिक्षाचालकाला मुका मार लागला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी संबंधित रिक्षाचालकाला अलगदपणे उचलून बाहेर काढलं आहे. हेही वाचा-Video : पुणेकरांनो, नदीचं पाणी वाढणार; खडकवासल्यातून विसर्गाला सुरुवात अग्निशमन दलानं त्वरित घटनास्थळी धाव घेत आपलं कर्तव्य पार पाडल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांचं देखील कौतुक केलं जात आहे. ही सर्व घटना एका स्थानिक नागरिकानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: