मराठी बातम्या /बातम्या /पुणे /विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मोठा घोटाळा उघड, CBSE शाळांना 12 लाखांमध्ये वाटले प्रमाणपत्र

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मोठा घोटाळा उघड, CBSE शाळांना 12 लाखांमध्ये वाटले प्रमाणपत्र

एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 हून अधिक सीबीएससी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या जे शासनाचे प्रमाणपत्र आहे. ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले

एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 हून अधिक सीबीएससी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या जे शासनाचे प्रमाणपत्र आहे. ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले

एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 हून अधिक सीबीएससी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या जे शासनाचे प्रमाणपत्र आहे. ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 09 जानेवारी : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3 हून अधिक सीबीएससी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या जे शासनाचे प्रमाणपत्र आहे. ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत, या शाळांना 12 लाखांमध्ये प्रमाणापत्र वाटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बीएमसीसी रोड, शिवाजीनगर,नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या तिन्ही सीबीएससी या इंग्रजी माध्यमाच्या शाळांच जे शासनाचे प्रमाणपत्र आहे.ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आहेत.

(PMC Recruitment: पुणे महापालिकेत ग्रॅज्युएट्सना मोठी संधी; परीक्षा न देताही मिळतेय थेट नोकरी; करा अप्लाय)

या तिन्ही शाळांची यादी शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. तसंच अजूनही जिल्ह्यातील काही शाळांमध्ये बनावट स्वरूपाचे प्रमाणपत्र दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.

(Explainer: ऑक्सफर्ड. केम्ब्रिजसारखी विद्यापीठं खरंच भारतात येणार? या आहेत सरकारच्या गाईडलाईन्स)

बारा लाख रुपयात बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्याकडून दिले जाणारी एनओसी ही टोळी चक्क बारा लाख रुपयांमध्ये सीबीएसीच्या संस्था चालकांना देत असल्याचं समोर आलं आहे. या शाळांची माहिती शासनाला दिली असून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे, असं औदुंबर उकिरडे यांनी सांगितलं.

First published:

Tags: पुणे, शाळा