मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुणेकरांसाठी मोठा दिलासा; रेल्वे यार्डचे रिमॉडेलिंग अवघ्या 120 दिवसांत पूर्ण होणार?

पुणेकरांसाठी मोठा दिलासा; रेल्वे यार्डचे रिमॉडेलिंग अवघ्या 120 दिवसांत पूर्ण होणार?

पुणे रेल्वे स्टेशन

पुणे रेल्वे स्टेशन

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे रेल्वे स्टेशन यार्ड रिमॉडलिंगचं काम चर्चेमध्ये आहे. हे काम येत्या एप्रिल महिन्यात सुरू होणार होते, मात्र आता काम आणखी पुढे ढकलण्यात आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune (Poona) [Poona], India

पुणे, 23 मार्च : गेल्या अनेक वर्षांपासून पुणे रेल्वे स्टेशन यार्ड रिमॉडलिंगचं काम चर्चेमध्ये आहे. हे काम येत्या एप्रिल महिन्यात सुरू होण्याचा अंदाज होता. मात्र आता हे काम आणखी पुढे ढकलण्यात आलं आहे. परंतु या कामासाठी लागणारा कालावधी मात्र कमी होणार आहे. पुर्वीच्या नियोजनानुसार हे काम 280 दिवसांत पूर्ण करण्यात येणार होते. मात्र आता कालावधी कमी करून हे काम 150 दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. रेल्वे स्टेशन यार्डच्या रिमॉडलिंगसाठी लागणारा कालावधी हा 150 दिवसांहून कमी करून 120 दिवसांवर आणण्याचा देखील प्रयत्न सुरू असल्याचं रेल्वे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

पावसाळ्यामुळे काम लांबणीवर  

पुणे रेल्वे स्टेशन यार्ड रिमॉडलिंगचं काम येत्या एप्रिल महिन्यात सुरू होईल अशी माहिती पुण्याच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू राणी दुबे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र ताऱीख निश्चित करण्यात आली नव्हती. परंतु एप्रिल महिन्यात काम सुरू केल्यास पावसाळा सुरू होण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक राहातात. पावसाळ्यात काम सुरू ठेवण्यास कामात अनेक अडचणी येऊ शकातात. त्यामुळे आता हे काम कदाचित ऑगस्टनंतर सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे.

कामाचा कालावधी घटणार  

नव्या माहितीनुसार पुणे रेल्वे स्टेशन यार्ड रिमॉडलिंगचं काम जरी लांबणीवर पडलं असलं तरी हे काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीमध्ये घट होणार आहे. त्यामुळे हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. रिमॉडलिंग काळात या भागातील रेल्वेसेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून, प्रवाशांची अडचण वाढू शकते.

First published:
top videos

    Tags: Pune