मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Big News : पुणे पोलिसांकडून नारायण राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लूक आऊट नोटीस

Big News : पुणे पोलिसांकडून नारायण राणेंच्या पत्नी आणि मुलाविरोधात लूक आऊट नोटीस

पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने याबाबतचे सर्क्युलर काढले आहे.

पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने याबाबतचे सर्क्युलर काढले आहे.

पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने याबाबतचे सर्क्युलर काढले आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

पुणे, 9 सप्टेंबर : DHFL कर्ज प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rame) यांच्या पत्नी नीलम राणे तसेच मुलगा आमदार नितेश राणे यांच्यासह 30 जणांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने याबाबतचे सर्क्युलर काढले आहे. नारायण राणे यांच्या कंपनीने DHFL कडून कर्ज घेतले होते. ते कर्ज वेळेत फेडले गेले नसल्याबाबतचा वाद न्यायप्रविष्ट आहे.

या पार्श्वभूमीवर तक्रार असलेल्या व्यक्ती विदेशात किंवा इतरत्र कुठे जाऊ नयेत यासाठीची खबरदारी घेण्याची विनंती DHFL कडून केंद्र सरकारला करण्यात आली होती. त्यानुसार केंद्राकडून राज्य सरकारला सूचना देण्यात आल्या आहेत. त्या आधारावर राज्यातील विमानतळे तसेच संबंधित अस्थापनांकडे सर्क्युलर पाठवण्यात आलं आहे.

हे ही वाचा-धनंजय मुंडेंची दुसरी पत्नी असण्याचा दावा करणारी महिला अडचणीत

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) या कंपनीकडून राणेंनी 65 कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. दोन कंपन्यांकडून एकूण 65 कोटींचे कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने 25 कोटींचं कर्ज घेतलं होतं. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती.

First published:

Tags: BJP, Narayan rane, Pune