Home /News /pune /

बापरे! पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी, नामवंत कंपनीतील 120 कामगारांना कोरोनाची लागण

बापरे! पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी, नामवंत कंपनीतील 120 कामगारांना कोरोनाची लागण

समुह संसर्गाच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची मोठी संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चाकण, 1 ऑगस्ट : पुणे जिल्ह्यातील (Pune District) चाकण औद्योगिक वसाहतीतील (Chakan MIDC) एका नामवंत कंपनीतील 120 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने औद्योगिक वसाहतीत खळबळ पसरली आहे. कंपनी व परिसर कंन्टेन्मेंट झोन घोषित केला आहे. तर आरोग्य विभागाने कंपनी परिसरात आज पहाणी केली. यावेळी गट विकास आधिकारी अजय जोशी,तालुका आरोग्य आधिकारी बळीराम गाढवे, सभापती अंकुश राक्षे उपस्थित होते. चाकणमधील नामवंत कंपनीत 120 कामगारांना कोरोनाची लागण झाली असून यातील काही कामगार पिंपरी चिंचवड तर काही खेड तालुक्यातील आहेत. या कामगारांच्या संपर्कात अनेक जण आले असल्याने या संसर्गामुळे खेड तालुक्यातील समुह संसर्गाच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची मोठी संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खेड तालुक्यात 1371 रुग्णांची नोंद झाली असून 861 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 25 जणांना मृत्यू झाला आहे. चाकण औद्योगिक वसाहत व राजगुरुनगर, चाकण आळंदी व खेड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी तोडण्यात अपयश येत असल्याने पुढील काळात कोरोनाच्या संसर्गाचे हे वाढते जाळे धोक्याची घंटा ठरणार आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात 84 हजार 765 बाधित रुग्ण असून 54 हजार 128 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 656 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 19 हजार 122, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 6 हजार 983, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 78, पुणे कॅन्टोंन्मेंट 137, खडकी विभागातील 30, ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 306 रुग्णांचा समावेश आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Pune news

पुढील बातम्या