मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुणेकरांसाठी मोठी बातमी; नऱ्हे, मांजरीसह 4 गावातील सीलबंदचा आदेश अखेर रद्द

पुणेकरांसाठी मोठी बातमी; नऱ्हे, मांजरीसह 4 गावातील सीलबंदचा आदेश अखेर रद्द

नाकाबंदीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने 4 गावांबाबतचा सीलबंदचा आदेश रद्द करण्यात आला आहे.

नाकाबंदीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने 4 गावांबाबतचा सीलबंदचा आदेश रद्द करण्यात आला आहे.

नाकाबंदीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने 4 गावांबाबतचा सीलबंदचा आदेश रद्द करण्यात आला आहे.

पुणे, 6 जून : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुणे परिसरातील अनेक कंपन्या सुरू झाल्या आहेत. मात्र अशा स्थितीतही पुण्यालगत असणाऱ्या चार गावांना पोलीस प्रशासनाकडून सील करण्यात आलं होतं. मात्र पुण्यालगतच्या त्या 4 गावातील सीलबंदचा आदेश अखेर रद्द करण्यात आला आहे. हवेलीच्या प्रांताधिकाऱ्यांनीच हा आदेश रद्द केला आहे. पुण्यालगत असणाऱ्या नऱ्हे, मांजरी, वाघोली, कदमवाकवस्ती ही चार गावं 6 दिवसांसाठी सील केली होती. नोकरदारांना पुण्यात ये-जा करण्यासाठी घालण्यात आली होती. या गावातील नोकरदारांच्या गैरसोईबद्दल न्यूज 18 लोकमतने आवाज उठवला. त्यानंतर नाकाबंदीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने 4 गावांबाबतचा सीलबंदचा आदेश रद्द करण्यात आला आहे. दुसरीकडे, पुण्यातील दुकानं उघडण्यास पोलीस हरकत घेत असल्याची तक्रार व्यापारी महासंघाने पालकमंत्र्यांकडे मांडताच अजित पवार यांनी दुकानं उघडण्यास काय अडचण आहे? असा सवाल उपस्थित करून पोलिसांना दणका दिला आहे. पालिका आयुक्तांनी 90 टक्के पुणे खुलं केलं असलं तरी काही भागात पोलीस दुकानं उघडू देत नसल्याची व्यापाऱ्यांची तक्रार होती. त्यावर अजित पवारांनी प्रशासनाला हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत. व्यापाऱ्यांची पोलीस आणि प्रशासनासोबत सोमवारी बैठक होईल. त्यानंतर पुणे शहरातील दुकाने उघडू शकतील, अशी आशा फतेचंद रांका यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील 6 हजार होलसेल दुकानं अजूनही बंद असल्याचं रांका यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पिटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची गंभीर बाब पुण्यात उघडी झाली. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबत दखल घेतली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी, तसेच या रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. संपादन - अक्षय शितोळे
First published:

Tags: Lockdown, Pune news

पुढील बातम्या