पुण्यात मोठी दुर्घटना टळली, अपहृत टँकरमधील अॅसिड दुसऱ्या टँकरमध्ये केलं शिप्ट

अपघातानंतर टँकरमधून वायू गळती होऊ लागली आहे आणि काही लोक बेशुद्ध झाले आहेत.

अपघातानंतर टँकरमधून वायू गळती होऊ लागली आहे आणि काही लोक बेशुद्ध झाले आहेत.

  • Share this:
पुणे, 27 मे :पुण्यात कोरोनाचं संकट असतानाच ही नवी दुर्घटना झाली आहे. पुण्यातील चांदणी चौक येथे केमिकलचा टँकरचा अपघात झाला. संबंधित टँकरतून वायूगळती होत असल्याने ट्रॅफिक थांबण्याचे आदेश आहेत. पुण्यातील चांदणीचौकात अँसिटिक अँसिडच्या टँकरला मोठ्या प्रमाणावर गलती सुरू झाल्यानं तिथं काहीकाळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण पोलिसांनी नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या मदतीने तात्काळ हे अॅसिड दुसऱ्या टँकरमध्ये शिप्ट करण्यात आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अमोनियम नायट्रेटच्या बॅगा वापरून रस्त्यावर पडलेलं अँसिटिक अॅसिड नलिफाईड करण्यात आल्याची माहिती. महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट महाराष्ट्रात Coronavirus चं थैमान सुरूच आहे. मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत खूप जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. दिवसभरात तब्बल 2190 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. गेल्या 24 तासांत 105 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू नोंदला गेला आहे. मृतांमध्ये फक्त मुंबईच नव्हे तर राज्यभरातल्या रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आता हा विषाणू राज्यभर पसरतोय का अशी भीती निर्माण झाली आहे. आज मृत्युमुखी पडल्याची नोंद झालेल्या 105 पैकी 32 मुंबईतले तर 9 पुण्यातले रुग्ण आहेत. एक रुग्ण गुजरातचा आहे. आतापर्यंत 1897 जणांचा या कोरोनाच्या साथीत बळी गेला आहे. ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे.
First published: