Pune: गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Pune: गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
राज ठाकरेंच्या भाषणातील 'त्या' विधानानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर त्यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. मात्र, आता मनसेला झटका देणारी बातमी पुण्यातून समोर आली आहे.
पुणे, 4 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात (MNS Gudi Padwa Melava) केलेल्या भाषणात मशिदीवरील भोंग्यांबाबत विधान केले. मशिदीवर भोंगे लावल्यास त्याच्या समोर हनुमान चालिसा लावण्यात येईल असे म्हणत त्यांनी आदेशच मनसैनिकांना दिले. यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यालयांवर लाऊडस्पीकर लावत मनसैनिकांनी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत लाऊड स्पीकर जप्त केले. मात्र, राज ठाकरे यांनी केलेल्या या विधानाचा मनसेला फटका बसल्याचं दिसत आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीद वरती भोंगे लावले तर समोर हनुमान चालीस लावा असे सांगितल्यानंतर अनेक ठिकाणी मनसे हनुमान चालीस लावले. मात्र, राज ठाकरेंनी केलेल्या या विधानानंतर पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील माझीद अमीन शेख हे मनसेच्या वॉर्ड क्रमांक 84 शाखेचे अध्यक्ष आहेत. अमीन शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात-धर्म या विषयांवर भर दिला जात आहे, या कारणास्तव मी राजीनामा देत आहे असं अमीन शेख यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.
वाचा : सुजात आंबेडकरांचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज, "तुमच्या विधानाला 100 टक्के पाठिंबा, आता केवळ अमित ठाकरेंना..."
मिळालेल्या माहितीनुसार, अमीन शेख यांच्यानंतर आता अनेक मनसेचे मुस्लिम कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी म्हटलं होतं, 'मी धर्मांध नाही..प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. यापूर्वी मशिदींवरील भोंग्याबाबत मी बोललो होतो. पण अजूनही ते सुरू आहे. यापुढे सरकारने मशिदीतील हे भोंगे काढले नाही तर त्या मशिदींबाहेर दुप्पट आवाजाने स्पिकर लावू आणि त्यात हनुमानचालीसा वाजवू', यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. मदरशांवर धाडी टाका, बघा तुम्हाला काय काय सापडले, असंही ते यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.