मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये अचानक मोठी वाढ; पोलीस बंदोबस्त वाढवला

अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये अचानक मोठी वाढ; पोलीस बंदोबस्त वाढवला

 विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेमध्ये आज अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेमध्ये आज अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेमध्ये आज अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

बारामती, 7 जानेवारी : विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांचा विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार असतो. मात्र आज अचानक अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अजित पवार हे विद्या प्रतिष्ठानमध्ये आहेत. या इमारतीच्या गेटच्या आत कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाहीये. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पोलिसांकडून कसून तपासणी सुरू आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये अचानक पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. मात्र अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये अचानक का वाढ करण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अजित पवार हे आठवड्यातून एकदा बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान येथे आपला जनता दरबार भरवतात.

 जनता दरबाराचे आयोजन  

अजित पवार यांच्या सुरक्षेमध्ये अचानक वाढ करण्यात आली आहे. अजित पवार दर आठवड्याला बारामतीमध्ये आपला जनता दरबार भरवतात. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान येथे हा जनता दरबार भरतो. मात्र आज अजित पवार हे जनता दरबारसाठी विद्या प्रतिष्ठान येथे आले असता आज अचानक त्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली. पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. मात्र हा पोलीस बंदोबस्त का वाढवण्यात आला या मागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

अजित पवारांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी 

अजित पवार हे दर आठवड्यातून एकदा बारामतीमध्ये जनता दरबार भरवतात. त्यांना भेटण्यासाठी आपल्या समस्या सांगण्यासाठी नागरिक इथे गर्दी करत असतात. अजित पवार नागरिकांच्या समस्या ऐकून घेतात. मात्र आज अचानक त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली असून, कुठल्याही नागरिकांना आत प्रवेश दिला जात नसल्यानं गेटबाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे.

First published:

Tags: Ajit pawar, Baramati, NCP, Police, Sharad Pawar