पुण्यातील प्रसिद्ध सोने व्यापाऱ्याची मोठी फसवणूक

पुण्यातील प्रसिद्ध सोने व्यापाऱ्याची मोठी फसवणूक

पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु. ना. गाडगीळ यांना 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.

  • Share this:

पुणे, 20 जानेवारी : पुण्यातील प्रसिद्ध सोने व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंदीगढ या ठिकाणी व्यवसाय सुरू करून देण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु. ना. गाडगीळ यांना 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.

याप्रकरणी सौरभ विद्याधर गाडगीळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रोहितकुमार शर्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सची शाखा चंदिगढ येथे उघडण्यासाठी 50 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवत रोहितकुमार शर्मा याने गाडगीळ यांच्या पुण्यातील कार्यालयात येऊन त्यांच्याशी संपर्क साधला.

रोहितकुमार शर्माने गाडगीळ यांचा विश्वास संपादन करून कर्ज वितरणासाठी आणि प्रक्रिया शुल्क म्हणून फिर्यादी कडून 1 कोटी 60 लाख 50 हजार रुपये इतकी रक्कम घेतली. दरम्यान या प्रक्रियेला अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही पैसे मिळतात नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 20, 2021, 10:44 PM IST

ताज्या बातम्या