Home /News /pune /

पुणे मनपाचा मोठा निर्णय; कोरोना रुग्णांकडून अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयांना दणका

पुणे मनपाचा मोठा निर्णय; कोरोना रुग्णांकडून अवाजवी बिल आकारणाऱ्या रुग्णालयांना दणका

कोरोनाच्या काळात रुग्णालयांकडून आकारले जाणारे बिल याबाबत नागरिकांमध्ये मोठी भीती आहे.

पुणे, 11 ऑगस्ट : राज्यात कोरोनाच्या कहराबरोबरच रुग्णालयांकडून आकारले जाणारे अव्वाच्यासव्वा बिलं ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाच्या उपचाराचा खर्च पाहूनच लोकांमध्ये कोरोनाविषयीची भीती अधिक बळावत आहे. यातच पुणे पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात यापुढे दीड लाखांच्यावर आकारणाऱ्या सर्व खासगी रुग्णालयाचे कोरोना बिलांचे ऑडिट करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना ही माहिती दिली. इतकचं नव्हे तर अवाजवी बिलांप्रकरणी पुणे मनपाकडून 25 रुग्णालयांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णवाढी पेक्षा डिस्चार्जचे प्रमाण जास्त, ही समाधानाची बाब असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. पुण्यात यापुढे दीड लाखांच्यावर सर्व कोरोना बिलांचे ऑडिट केलं जाणार आहे. कोरोना उपचारांच्या नावाखाली अनेक खासगी रुग्णालयांकडून रूग्णांची लूट सुरू होती. याबाबत तक्रारी देखील पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पुणे मनपा यासंबंधी 25 रुग्णालयांना नोटीसाही धाडल्या आहेत. याबाबत पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी न्यूज18 लोकमतला याबाबत माहिती दिली. हे वाचा-पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी, डॉक्टरने केली महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी दरम्यान पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदल करण्यात आल्यानंतर आता पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. सध्या नवल किशोर राम यांच्याजागी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे कारभार सांभाळत आहेत. जिल्हाधिकारीपदासाठी 3 नावं सध्या चर्चेत आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Corona virus in india

पुढील बातम्या