सावधान! पोलिसांची सोशल मीडियावर वक्रदृष्टी, फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट

सावधान! पोलिसांची सोशल मीडियावर वक्रदृष्टी, फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट

1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये मोठा हिंसाचार झाला होता.

  • Share this:

पुणे,29 डिसेंबर: पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी विजयस्तंभ अभिवादन समारंभात हिंसाचार झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊन नये यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या यंदा यावेळी वाढेल, असा अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारीही केली आहे.

फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट

कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांकडून 250 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सना नोटीसा बजावल्या आहेत. याशिवाय पोलिसांकडून 744 जणांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. फेसबुकवरून 12 पेजेस डिलीट करण्यात आलेत. महसूल प्रशासनाने ही मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यान्वयित केली आहे.

पोलिसांची सोशल मीडियावर वक्रदृष्टी..

पोलिसांनी आतापर्यंत 744 जणांना नोटिसा बजावल्या आहेत. 'टिकटॉक'वरून तेढ वाढवणारे 25 व्हिडीओ डिलीट करण्यात आले आहेत. तसेच 12 फेसबुकची पेजेस बंद करण्यात आली आहेत. 1 जानेवारी 2020 ला परिसरातील शाळा, कॉलेजेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. तसेच आठवडा बाजारही बंद राहणार आहे. पुणे- नगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पार्किंगसाठी 15 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. विजस्तंभावर जाण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आली आहे. 400 वरिष्ठ अधिकारी आणि 10 हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर पोलिस सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

250 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सना नोटीसा

कोरेगाव भीमा शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे पोलिसांकडून 250 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सना नोटीसा बजावल्या आहेत. ग्रुपवर कोणत्याही अफवा पसरवणारी पोस्ट व्हायरल करू नका, अशी सक्त ताकीदही पुणे पोलिसांनी संबंधीत ग्रुप अ‍ॅडमिन्सना दिली आहे. यापूर्वीही 163 लोकांना कोरेगाव भीमा 'गाव बंदी' जाहीर केली होती. त्यात हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचा समावेश आहे. मिलिंद एकबोटे हे भीमा-कोरेगाव दंगलीतील आरोपी असून ते सध्या जामिनावर आहे.

कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आला आहे. दरम्यान, 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भीमामध्ये मोठा हिंसाचार झाला होता. या प्रकरणी संभाजी भिडे गुरूजी व मिलींद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे-ग्रामीणचे अतिरिक्त एसपी जयंत मीना यांनी सांगितले की, भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून 250 हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सना नोटीस पाठवण्यात आले आहेत. अफवा पसरवणऱ्या ग्रुप्सना इशारा देण्यात आला आहे. संबंधीत ग्रुप अ‍ॅडमिन्सना सेटिंग्ज बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन मेसेजेसचे नियमन करता येईल. समाजाच्या भावना दुखावणार नाही, अशा पोस्ट ग्रुपवर टाकू नये, अशा सूचना ग्रुप सदस्यांना देण्यास अ‍ॅडमिन्सना बजावण्यात आले आहे.

First published: December 29, 2019, 2:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading