मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

भीमा कोरेगांव: सरपंचांच्या चौकशीतून पुढे आली महत्त्वाची माहिती, 'त्या' फलकामुळे शांतता भंगल्याचा दावा

भीमा कोरेगांव: सरपंचांच्या चौकशीतून पुढे आली महत्त्वाची माहिती, 'त्या' फलकामुळे शांतता भंगल्याचा दावा

वढू बुद्रुक (Vadu Budruk) गावात गोविंद गोपाळ (Govind Gopal) यांच्याविषयी माहिती देणारा बोर्ड  लावल्यामुळेच शांतता भंग पावली, अशी माहिती वढू बुद्रुकच्या तत्कालीन सरपंचांनी (ex sarpanch) या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाला (Bhima koregoan Inquiry commission) दिली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  desk news

पुणे, 4 ऑगस्ट : वढू बुद्रुक (Vadhu Budruk) गावात गोविंद गोपाळ (Govind Gopal) यांच्याविषयी माहिती देणारा बोर्ड (board) लावल्यामुळेच शांतता भंग पावली, अशी माहिती वढू बुद्रुकच्या तत्कालीन सरपंचांनी (ex sarpanch) या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाला (Inquiry commission) दिली आहे. भीमा कोरेगावची घटना घडली, त्यावेळी वढू बुद्रुक गावच्या सरपंच असणाऱ्या रेखा शिवले (Rekha Shivale) यांची कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाने बुधवारी साक्ष नोंदवली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या सरपंच

कोरेगाव-भीमापासून 4 किलोमीटर अंतराव वढू बुद्रुक हे गाव आहे. तिथे छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार केले गेले आणि तिथे समाधीसुद्धा आहे. तिथे आणखी एक समाधीसदृश  बांधकाम आहे. दलित समाजाच्या म्हणण्यानुसार ही गोविंद गोपाळ ढेगोजी मेघोजी यांची समाधी आहे. 17 व्या शतकातले ते समाजाचे श्रद्धास्थान होते.

छत्रपती संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कोणी केले यावरून वाद आहे. गोविंद गोपाळ यांनीच अंत्यसंस्कार केले होते आणि ती त्यांचीच समाधी असल्याचं दलित समाजाचं म्हणणं आहे. गोविंद गोपाळ यांचे आपण वारसदार असल्याचं गावातील गायकवाड कुटुंबाचं म्हणणं आहे. औरंगजेबाची आज्ञा झुगारून  शिवले देशमुख यांनी अंत्यस्कार केले असं मराठा समाजाचं म्हणणं आहे.

तत्कालीन सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 डिसेंबर 2017 रोजी गायकवाड यांनी गोविंद गोपाळ यांच्या कार्याची माहिती लिहिलेला बोर्ड गावात उभा केला. तर मराठा समाजाच्या लोकांनी तो बोर्ड काढून टाकला. त्यावरून वादाची ठिणगी पेटली आणि 1 जानेवारी 2018 ची घटना घडली. गावात बोर्ड उभं करण्याची आणि तो काढून टाकण्याची घटना घडली नसती, तर शांतता भंग पावण्याचा प्रश्नच उद्भवला नसता, असं तत्कालीन सरपंचांनी नोंदवलेल्या साक्षीत म्हटल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे.

हे वाचा -पुण्यासह कोकणाला झोडपणार पाऊस; राज्यात 7 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

1 जानेवारी 2018 ला कोरेगाव-भीमात उसळलेल्या दंगलीत एका नागरिकाचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. त्यापूर्वीदेखील वर्षानुवर्षं कोरेगाव भीमाला येणारे दलित समाजाचे नागरिक वडू बुद्रुकलाही जात असत. मात्र तो बोर्ड उभा राहिल्यामुळे वादाची ठिणगी पेटल्याचं तत्कालीन सरपंचांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Pune (City/Town/Village)