पुण्यातील भवानी पेठ ठरली कोरोना हॉटस्पॉट; जाणून घ्या कुठे, किती रुग्ण?

पुण्यातील भवानी पेठ ठरली कोरोना हॉटस्पॉट; जाणून घ्या कुठे, किती रुग्ण?

पुण्यातील काही भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

पुणे, 1 मे : पुणे जिल्ह्यात कोरोनाबधितांचा आकडा 1815 वर पोहोचला असून मृतांच्या अकड्याने शंभरी गाठली आहे. पुणे शहरात आत्तापर्यंत 92 मृत्यू नोंदवले गेले आहेत. काल पुणे शहरात 93 नवीन रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्ण सध्या 1611 इतके आहेत. तर पुण्यात काल 51 जण बरे होऊन घरीही गेले आहेत. आत्ता पर्यंत पुण्यात एकूण 325 रुग्ण बरे झाले आहेत. मात्र पुण्यातील काही भाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यात कोणत्या क्षेत्रिय कार्यालय परिसरात किती कोरोनाबधित रुग्ण? (1 मे 2020)

1) भवानी पेठ : 352

2) ढोले पाटील रोड : 246

3) शिवाजीनगर-घोले रोड : 227

4) येरवडा : 172

5) कसबा-विश्रामबाग : 151

6) धनकवडी-सहकारनगर : 121

7) वानवडी-रामटेकडी : 90

8) बिबवेवाडी : 55

9) हडपसर-मुंढवा : 54

10) नगर रोड : 42

11) कोंढवा : 28

12) सिंहगड रोड : 11

13) वारजे-कर्वेनगर : 9

14) औंध-बाणेर : 4

15) कोथरुड-बावधन : 3

दरम्यान, पुण्यात 20 मार्चपासून रुग्णसंख्या दुप्पट होण्यासाठी सरासरी पाच ते आठ दिवसांचा कालावधी लागतो आहे. या कालावधीमध्ये वाढ होण्यास सुरूवात झाली असून ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.

रुग्णांची काय आहे स्थिती?

- डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 691 रुग्णांवर उपचार

- कोरोनाचा संसर्ग झालेले 51 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला

- 64 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

- पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या- 1195.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 2, 2020, 10:00 AM IST

ताज्या बातम्या