• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • 'भाऊ रंगारी'च्या कार्यकर्त्यांचा 20 आॅगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

'भाऊ रंगारी'च्या कार्यकर्त्यांचा 20 आॅगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

नुकताच पुण्यात शनिवार वाड्यावर शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचं उदघाटन मुख्य मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं पण देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात भाऊ रंगारी यांचा उल्लेख न केल्याने रंगारी ट्रस्टचे कार्यकर्ते नाराज झाले.

  • Share this:
अद्वैत मेहता, पुणे, 14 आॅगस्ट : सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ कुणी रोवली, उत्सवाचे जनक भाऊ रंगारी का लोकमान्य टिळक हा वाद शमण्याऐवजी चिघळत चाललाय.नुकताच पुण्यात शनिवार वाड्यावर शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचं उदघाटन मुख्य मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं पण देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात भाऊ रंगारी यांचा उल्लेख न केल्याने रंगारी ट्रस्टचे कार्यकर्ते नाराज झाले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारलेला सन्मान महापालिकेच्या प्रवेश द्वारावर ठेवत कार्यकर्त्यांनी निषेध केला. येत्या 20 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी भूमिका जाहीर करावी अशी मागणी करत बेमुदत उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय.ट्रस्टने कोर्टात याचिकाही दाखल केलीय. यातच गेल्या महिन्यात महापौर मुक्ता टिळक यांच्या केसरी वाड्यातील घरी झालेल्या चर्चेची ध्वनिफीत सादर करून ट्रस्टने टिळक यांचा पेच आणखी वाढवलाय. या ऑडिओ क्लिपमध्ये  सार्वजनिक गणेशाची स्थापना रंगारी यांनी केली आणि प्रचार प्रसार लोकमान्यांनी केला अशी कबुली मुक्ता टिळक यांनी दिल्याचा दावा ट्रस्टच्या विश्वस्तांनी केलाय. 125व्या उत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हात समावेश करण्यासाठी भाऊ रंगारी यांचे फोटो मागवले पण महापौरांनी नंतर घुमजाव केलं असा आरोप ट्रस्टनं  केलाय. यातच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं भाऊ रंगारी मंडळाची मूर्ती आणि रथ हा देशातील पहिला ecofriendly रथ,मूर्ती असल्याची नोंद करत 1892 साली म्हणजे 126 वर्षांपूर्वीची मूर्ती,रथ असल्यावर शिक्कामोर्तब केल्यामुळे रंगारी यांनी 1892 तर टिळक यांनी 1893 साली गणेश उत्सव साजरा केला या दाव्याला बळ मिळालं आहे, असं ट्रस्ट म्हणतंय. दुसरीकडे भाऊ रंगारी यांच्या आधी पेशव्यांनी गणेश उत्सव साजरा केल्याच्याही नोंदी आहेत.भले रंगारी यांनी टिळकांच्या आधी गणेश उत्सव साजरा करायला सुरुवात केली पण इंग्रजांविरोधात गणेश उत्सवाच्या माध्यमातून टिळकांनीच लोकांमध्ये एकजूट निर्माण केली. रस्त्यावर उतरवायला लावलं म्हणून जनक टिळक असा टिळक समर्थकांचा दावा आहे.इतिहास तज्ज्ञांची समिती नेमून फैसला करा अशीही मागणी झालीय. एकूणच गणेश उत्सवाच्या जनकपदाचा वाद सहजासहजी मिटणार नाही याचे संकेत मिळत आहेत.
First published: