मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात आणखी एका लशीची निर्मिती; Covishield बरोबर ऑगस्टपासून भारत बायोटेकची Covaxin सुद्धा Made in Pune

पुण्यात आणखी एका लशीची निर्मिती; Covishield बरोबर ऑगस्टपासून भारत बायोटेकची Covaxin सुद्धा Made in Pune

कोवॅक्सिन (Covaxin) लसीची निर्मिती करणाऱ्या कंपनीची सहयोगी कंपनी बायोवेट प्रायव्हेट लिमिटेड  (Biovet Pvt Ltd) पुण्यातील मांजरीजवळ लस निर्मितीचा एक प्रकल्प ऑगस्टपर्यंत पूर्णपणे सुरू करणार आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 14 मे : कोवॅक्सिन (Covaxin) लसीची निर्मिती करणाऱ्या कंपनीची सहयोगी कंपनी बायोवेट प्रायव्हेट लिमिटेड  (Biovet Pvt Ltd) कडून पुण्यातील मांजरीजवळ लस निर्मितीचा एक प्रकल्प ऑगस्टपर्यंत पूर्णपणे सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी बुधवारी या प्रकल्पाचा पाहणी दौरा केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने अलीकडेच बायोवेट कंपनीला Covaxin लसीच्या निर्मितीसाठी या परिसरात 12 हेक्टर भूभागावर निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात कंपनीला मंजुरी दिली आहे.

प्रकल्पासाठीचा प्राथमिक आराखडा तयार स्थितीत आहे. येथे आम्हाला एक विशेष बाब दिसून आली ती म्हणजे येथील कर्मचारी वर्ग खूपच दक्षता पूर्व काम करत असून पूर्ण समर्पक भावनेने ते काम करत आहेत. प्रकल्पासाठी सर्व गोष्टी तयार असल्याचे दिसून आले. येथील सर्व प्रक्रिया सुरळीत आहे, असे सौरभ राव यांनी सांगितले.

हे वाचा - आईच्या निधनानंतरही उपचार केल्याचा दावा आणि लाटलं हजारोंचं बिल, मावळमधील धक्कादायक प्रकार

सध्या बायोवेट (Biovet Pvt Ltd) कंपनीचे अधिकारी या मूलभूत आराखड्याचा लस निर्मितीच्या दृष्टीने अभ्यास करीत आहेत. त्यांनी आम्हाला या अभ्यासाचे काम आठवडाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असल्याचेही राव यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून कंपनीला सर्व परवाने, मंजुरी, विविध नियम व अटी यासंदर्भात कोणत्याही बाबींसाठी सर्व पद्धतीचे सहकार्य करण्यात येत आहे. त्यामुळे ऑगस्टपर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होऊन लसीची पहिली खेप बाहेर येण्याची आशा आहे, असेही राव म्हणाले.

हे वाचा - विषारी साप पकडता पकडता अचानक लुंगी सोडली आणि…; VIDEO पाहून लोक झालेत हैराण!

काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार संबंधित प्राधिकरण आन्ना हा प्रकल्प बायो वेट कंपनीला देण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी अमेरिकेची एक बहुराष्ट्रीय कंपनी मर्क अंड येथे काम करत होती.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Pune, Sanjeevani