मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

मंदिरं उघडण्याबद्दल तारतम्य बाळगा, शरद पवारांचा भाजपला सल्ला

मंदिरं उघडण्याबद्दल तारतम्य बाळगा, शरद पवारांचा भाजपला सल्ला

  आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त केला होता.

आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त केला होता.

'कोविडबद्दल केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली दिली आहे. आणखी काही दिवस खबरदारी घ्यायची गरज आहे'

पुणे, 04 ऑगस्ट : कोरोनाची (corona) लाट ओसरली असल्यामुळे सर्वत्र बाजारपेठा खुला करण्यात आल्या आहे. राजकीय सभा आणि रॅली सुद्धा सुरू आहे. त्यामुळे मंदिरं (temple open in maharashtra) सुद्धा उघडण्यात यावी, अशी मागणी भाजपने (bjp) केली आहे. पण, केंद्र सरकारनेच कोविडसाठी नियमावली दिली आहे, त्यामुळे विरोधकांनी तारतम्य बाळगावे, असा सल्लावजा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी लगावला.

पुण्यात शरद पवारांच्या हस्ते कर्वेनगरमधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूलच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी मंदिरं उघडण्याच्या मागणीवर आपली बाजू मांडली.

'मंदिरं उघडण्याची भाजप मागणी करत आहे. आंदोलनं करत आहे पण विरोधकांनी याबाबत तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे' असा सल्लावजा टोला पवारांनी लगावला.

सरकारी अधिकाऱ्यांना आता दररोज 5 मिनिटांचा मिळणार 'योग ब्रेक'; नवा आदेश

'कोविडबद्दल केंद्र सरकारने राज्य सरकारला काही नियमावली दिली आहे. आणखी काही दिवस खबरदारी घ्यायची गरज आहे असा निर्देश आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ती काळजी घेत आहेत, अन्य घटक काही दुसरे मत असेल तर लोकशाही आहे. केंद्र सरकारच्या विचारांची लोक आहेत त्यांनी तारतम्य ठेवण्याची गरज आहे' असा टोलाही शरद पवारांनी विरोधकांना लगावला.

बापरे! घोड्याने लाथ मारली आणि डोळाच बाहेर पडला; चिमुकलीला पाहून डॉक्टरही हादरले

'अनेक मंत्री आणि आमदारांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता पवार म्हणाले की, 'केंद्र सरकारकडून अशा संस्थांचा वापर सध्या विरोधकांना नमवण्यासाठी केला जात आहे आणि हे दुर्दैवी आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राजू शेट्टींचं नाव वगळलं नाही!

राजू शेट्टी यांचं सहकार कृषीक्षेत्रातलं योगदान लक्षात घेऊनच आम्ही त्यांचं नाव राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत दिले होते. पण पुढे काय झालं माहित नाही. राज्यपालांकडे तो विषय प्रलंबित आहे. आम्ही तरी त्यांचं नाव यादीतून वगळलेलं नाही' असा स्पष्ट खुलासा शरद पवार यांनी केला.

अकोल्यात महिला तलाठ्याचा प्रताप, मोबाइलवर मारला डल्ला; CCTVमध्ये पकडली गेली चोरी

तसंच, 'राजू शेट्टींना दिलेला शब्द आम्ही पाळलाय, आता यावर त्यांनी काय विचार व्यक्त केले आहे,  यावर मी बोलणार नाही' असंही पवार म्हणाले.

First published: