पुणे, 26 डिसेंबर : गोधडी म्हंटलं की सर्वांना आजीची आठवण येते. आजीनं शिवलेली ती मऊशार गोधडी अंगावर घेण्याचा थंडीमध्ये सुख काय औरच असते. सध्याच्या छोट्या कुटुंब पद्धतीमध्ये गोधडी शिवण्याची कला लुप्त होत आहे. नव्या पिढीलाही गोधडीचं सुख मिळावं यासाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीच्या नीरज बोराटे या तरूणानं गोधडीचा उद्योग सुरू केला आहे. तब्बल 19 देशांमध्ये त्याची गोधडी आणि घोंगडी निर्यात होते.
कसा सुरु केला व्यवसाय?
नीरजनं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्याची कापड उद्योगातील कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं वर्षभर नोकरी केली आणि या व्यवसायाला सुरूवात केली. 'मी माझ्या आजीनं तयार केलेली गोधडी नेहमी वापरतो. या गोधडीबद्दल मी आजीला नेहमी प्रश्न विचार असे. माझ्या गोधडीशी निगडीत अनेक उबदार आठवणी आहेत. आजी गोधडी कशी शिवते हे मी पाहिलं होतं. त्याच गोधडीला व्यावसायिक रुप देण्याचा मी निर्णय घेतला.
मी दोन कारागिरांपासून Mother Quilts या ब्रँडच्या अंतर्गत गोधडी आणि Ghongadi.Com च्या अंतर्गत घोंगडी शिवण्याचा व्यवसाय सुरू केला. सध्या माझ्याकडे नऊ राज्यातील साडेतीनशे कारागीर काम करून 19 देशांमध्ये आमची गोधडी आणि घोंगडी निर्यात होते,' अशी माहिती नीरजनं दिली.
नोकरी करत केला 6 महिन्यांचा कोर्स, आता करतात लाखोंची कमाई! Video
प्रत्येक राज्याची खासियत
नीरज पुढे सांगतो की, 'गोधडी फक्त महाराष्ट्रातच नसून इतर राज्यात देखील असते. कर्नाटकचे डिझाईन वेगळे आहे राजस्थानची खासियत निराळी आहे. महाराष्ट्राचा पॅचवर्क फेमस आहे. या सर्वांची विविधता जपून आम्ही गोधडी शिवत आहे. यामुळे आम्हाला सगळ्या राज्यांमधून विशेष मागणी येते. ग्राहकांनाी त्यांच्या राज्यातील शैलीनुसार आवडेल अशी गोधडी आम्ही शिवून देतो.
या गोधड्यांची किंमत चौदाशे ते 20 हजार रुपये इतकी आहे. जुन्या कापडापासून बनवलेल्या गोधडीची किंमत 1400 रुपये आहे. नवीन कापडापासून बनलेली गोधडी चार ते पाच हजार तर 70-80 वर्ष जुन्या गोधड्यापासून आम्ही केलेल्या निर्मितीची किंमत 20 हजार रुपयांपर्यंत आहे, अशी माहिती नीरजनं दिली.
गोधडीपासून बरच काही
ग्राहकांनी जुन्या साड्या, कपडे आणून दिले तरी त्यापासून आम्ही गोधडी विकतो. बारामती तालुक्याच्या आसपास घोंगडी हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. आम्ही पारंपारिक घोंगडीसह जॅकेट्स, मफलर्स, खेळणी तयार करतो. त्यालाही ग्राहकांची मोठी पसंती असे, असं नीरजनं स्पष्ट केलं.
गोधडीमध्ये एक नैसर्गिक उब असते. ती उब आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. ही गोधडी आम्ही हातानं शिवतो. स्थानिक कारागीर हे काम करतात. त्यांची कला जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहचावी, त्यांच्या प्रत्येक गोधडीला चांगली किंमत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे, असं नीरजनं सांगितलं.
गुगल मॅपवरून साभार
अधिक माहितीसाठी संपर्क
नीरज बोराटे - 9765566888
ईमेल - Connect@motherquilts.comwww.ghongadi.com
पत्ता - 917/19C, हेमलता बिल्डिंग, वैशाली हॉटेलसमोर, एफसी रोड, पुणे - 400004
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.