बारामती, 25 जुलै: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या खास शैलीसाठी ओळखले जातात. अजित पवार हे नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलत असतात. आक्रमक स्वभाव असलेल्या अजित पवारांचे आज एक वेगळे आणि खूपच खास रूप पहायला मिळाले. बारामती (Baramati) दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांच्याकडे एका चहा टपरी चालकाने (Tea Stall Owner) एक इच्छा व्यक्त केली आणि अजित पवारांनी तात्काळ त्या टपरी चालकाची ती इच्छाही पूर्ण केली.
झालं असं की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामती दौरा होता. या दौऱ्यात विविध विकास कामांची पाहणी अजित पवारांनी केली. त्यानंतर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचा कार्यक्रम आटोपून जात आसताना एका कार्यकर्त्याने अजितदादांना आग्रह धरला की.... दादा मी फिरत्या वाहनावर टी स्टॉल चालू केले आहे याचे उद्घाटन आपण करावे ही इच्छा आहे.
रायगडमधील दरड कोसळतानाचा LIVE VIDEO
अजित पवारांनी चहा टपरीचं उद्घाटन करत घेतला चहाचा आस्वाद pic.twitter.com/iJCDJs0N5j
— News18Lokmat (@News18lokmat) July 25, 2021
यानंतर अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या कार्यकर्त्याच्या चहाच्या टपरीवर पोहोचले. मग या चहाच्या टपरीचे उद्घाटन केले इतकेच नाही तर अजितदादांनी तुझ्या चहाची क्वॉलिटी आहे का? असे विचारून स्वतः चहा मागून त्याचा आस्वाद घेतला. स्वत: अजित पवार यांनी आपल्या चहा टपरीचं उद्घाटन करुन चहाचा आस्वाद घेतल्याने चहाटपरी चालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका
बेकायदेशीर अवैध व्यवसाय कोण करत असाल, सावकारी करत असाल तर त्याला मोक्का लावला जाईल असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यंत्री काय वसुली करायला बसला नाही असे वक्तव्य अजित पवार यांनी बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Baramati, Maharashtra, Mumbai, Pune, Tea, Tea drinker