Home /News /pune /

Remdesivirच्या बाटलीत चक्क पॅरासिटामॉल भरुन विक्री, चौघांना अटक

Remdesivirच्या बाटलीत चक्क पॅरासिटामॉल भरुन विक्री, चौघांना अटक

Remdesivir: रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असताना आता एक अजब प्रकार समोर आला आहे. रेमडेसिवीरच्या नावाखाली चक्क पॅरासिटामॉलची विक्री होत असल्याची घटना उघडकीस आली आहे.

बारामती, 17 एप्रिल: कोरोना (Corona) बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना आरोग्य यंत्रणाही कमी पडत असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नाहीये तर कुठे रेमडेसिवीर (Remdesivir), ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen shortage) जाणवत आहे. गंभीर कोरोना बाधित रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा (Remdesivir injection shortage) जाणवत असल्याने काही नागरिक याचा गैरफायदा घेऊन अक्षरश: रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करत आहेत. अशाच एका टोळीचा पर्दाफाश बारामती पोलिसांनी (Baramati Police) केला आहे. पोलिसांनी चौघांना केली अटक रेमडेसिवीरच्या बाटलीत चक्क पॅरासिटामॉल मिसळून रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणून विक्री करणाऱ्या टोळीला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रेमेडसिवीर इंजेक्शन 35 हजाराला विक्री करणाऱ्या एका युवकाला अटक केल्यानंतर त्याने तोंड उघडल्यावर ही धक्कादायक माहिती पुढे आली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. असा सुरू होता गोरखधंदा बारामती शहरातील फलटण चौकात रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी संबंधित युवकाने बोलावल्यानंतर सापळा लावून तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. एक इंजेक्शन 35 हजार या प्रमाणे दोन इंजेक्शनचे 70 हजार रुपये घेतले गेले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर एका दवाखान्यातील कर्मचारी रिकाम्या झालेल्या रेमडेसिवीरच्या मोकळया बाटल्या आणून त्यात सिरींजने पॅरासिटामॉल मिसळून पुन्हा फेव्हिक्विकच्या मदतीने या बाटल्या बंद करुन पुन्हा त्या बाजारात नव्या म्हणून काळ्या बाजारात जादा दराने विक्री करण्याचा हा गोरखधंदा सुरु होता. वाचा: मुख्यमंत्र्यांकडून PM मोदींना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न, मात्र... नागपूर येथे डॉक्टर आणि वॉर्डबॉय अटकेत नागपुरात दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यातही मोठ्या प्रमाणात वाढत असलेले गंभीर रुग्ण चिंतेची बाब ठरत आहे. त्यातच गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर लक्षात घेता नागपुरातील काही डॉक्टरांनी आता याचा काळा बाजार करायला सुरुवात केली आहे. नागपूर पोलिसांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा गुरुवारी रात्री पर्दाफाश केला आहे. यात एक डॉक्टर आणि तीन वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 15 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Baramati, Coronavirus, Police

पुढील बातम्या