Home /News /pune /

बारामती पोलिसांची मोठी कारवाई; पंजाबमधून विक्रीसाठी आणलेल्या तलवारींचा साठा जप्त

बारामती पोलिसांची मोठी कारवाई; पंजाबमधून विक्रीसाठी आणलेल्या तलवारींचा साठा जप्त

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे आढळलेल्या गोणीत तब्बल 20 तलवारी मिळाल्या. याशिवाय एक पिस्तुलही मिळाले. त्याने या तलवारी अमृतसर (पंजाब) येथून बारामतीत विक्रीसाठी आणल्या होत्या.

बारामती, 21 एप्रिल: बारामती शहर पोलिसांनी (Baramati City Police) नितीन मल्हारी खोमणे (वय 25, रा. पिंपळी, ता. बारामती) या सराईताकडून 20 तलवारींसह एक गावठी पिस्तुल जप्त केले. एकाच वेळी 20 तलवारी जप्त (20 sword seized) केल्याची पुणे ग्रामीणमधील ही सर्वात मोठी कारवाई आहे. सहाय्यक फौजदार शिवाजी निकम यांना खोमणे हा पिंपळीतून बारामती शहरात तलवारी विक्रीसाठी घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, निकम, अकबर शेख, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, अतुल जाधव, होमगार्ड साळुंके यांनी बांदलवाडीत निरा डावा कालव्यालगत सापळा रचला. खोमणे हा दुचाकीवरून (एमएच-42, जी 2816) येत असताना त्याचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडील गोणीत तब्बल 20 तलवारी मिळाल्या. याशिवाय एक पिस्तुलही मिळाले. त्याने या तलवारी अमृतसर (पंजाब) येथून बारामतीत विक्रीसाठी आणल्या होत्या. त्याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा, मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी खोमणे याच्या विरोधात यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिंपरीत दिवसाढवळ्या गँगवॉर  पिंपरी चिंचवडमधील ओटास्कीम भागात गँगवारचा भडका उडाला आहे. ज्यामध्ये सहा जणांच्या टोळीने एका तरुणावर हल्ला करुन त्याची निघृण हत्या केली आहे. ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Baramati, Crime

पुढील बातम्या