Home /News /pune /

शरद पवारांच्या बारामतीत नगरपालिकेवर पहिल्यांदा फडकले काळे झेंडे!

शरद पवारांच्या बारामतीत नगरपालिकेवर पहिल्यांदा फडकले काळे झेंडे!

नगरपालिकेच्या इमारतीवर चढून कर्मचाऱ्यांनी काळे झेंडे फडकवून दिल्या घोषणा...

बारामती, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar), राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्या बारामतीत (Baramati) पहिल्यांदा नगरपालिकेवर काळे झेंडे फडकल्याचं पाहायला मिळालं. नगरपालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) मिळवण्यासाठी थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून शुक्रवारी आंदोलन करून काळे झेंडे दाखवले. दिवाळीनिमित्त नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बोनस मिळावा, अशी मागणी केली. या मागणीसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलन पुकारलं आहे. हेही वाचा...किरीट सोमैयांचा शिवसेनेवर पलटवार! महापौर, ठाकरे सरकारविरोधात हायकोर्टात याचिका आज (शुक्रवार) आंदोलनाचा दुसरा दिवस असून त्यांनी नगराध्यक्षा किंवा नगरसेवकांपैकी कोणीही भेटायला आलं नाही. त्यामुळे नगरपालिका कर्मचारी आणखी संतप्त झाले. त्यांनी थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून काळे झेंडे फडकवून आंदोलन केलं. घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही काल या कर्मचारी संघटनेकडून निवेदन देण्यात आल आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय न झाल्यानं दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे. कर्मचाऱ्यांनी घेतली 'ही' भूमिका... सानुग्रह अनुदान मिळालेच, पाहिजे, अशी भूमिका नगरपालिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. याबाबत कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी काही प्रमुख नगरसेवक गेले होते. मात्र, तरी देखील तोडगा निघाला नाही. त्यामुळे हा प्रश्च आणखी चिघळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांनी अनुदान देण्याच्या संदर्भात प्रशासनाला अनेक उपाययोजना सुचवल्या होत्या. मात्र, त्याबाबत प्रशासन गंभीर नाही. प्रशासनानं या संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, अशी कर्मचाऱ्यांनी आशा आहे. नागरिकांना वेठीस धरणार नाही... शहरातील नागरिकांना वेठीस न धरता हे आंदोलन करण्यात येत असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. पुणे जिल्ह्यातील इतर नगरपालिकांनी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिलं असताना बारामती नगरपालिका का देऊ शकत नाही, असा सवाल आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. हेही वाचा..रुग्णालयानं 81 वर्षांच्या पत्नीची भेट नाकारली म्हणून पतीनं काय केलं पाहा VIDEO कोरोनाच्या काळात कर्मचाऱ्यांनी जीवाची जोखीम स्वीकारून दिवसरात्र काम केलं. कर्मचाऱ्यांनी केलेलं काम विचारात घेका सहानुभूतीनं प्रशासनानं निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Ajit pawar, Baramati, Maharashtra, Pune, Sharad pawar, Supriya sule

पुढील बातम्या