मराठी बातम्या /बातम्या /पुणे /गोबरगॅसमध्ये गुदमरून बापलेकासह चौघांचा मृत्यू, अडकलेल्या एकाला बाहेर काढताना दुर्घटना

गोबरगॅसमध्ये गुदमरून बापलेकासह चौघांचा मृत्यू, अडकलेल्या एकाला बाहेर काढताना दुर्घटना

 एक जण कचरा साफ करत असताना गोबर गॅसमध्ये अडकला होता, त्याला काढताना चौघांचा मृत्यू झाला असून एक जण अत्यवस्थ असल्याची माहिती समजते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बारामती, 15 मार्च : ब्रिटिश कालीन मेणवली (गोबर गॅस) स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तीन शेतकऱ्यांसह चौघांचा गुदमरून मृत्यू झाला. एक जण मेणवलीमध्ये अडकला होता, त्याला काढताना चौघांचा मृत्यू झाला. चौघांमध्ये बाप लेकांचाही समावेश आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामती तालुक्यातील खांडज इथे ही घटना घडली.

याबाबत मिळालेली अशी की, खांडज येथील 22 फाटा जवळ ब्रिटिशकालीन मेणवली आहे. यामध्ये शेण व कचरा साठलेला होता. हा कचरा साफ करण्यास गेले असताना यामध्ये प्रथम शेतमजूर बाबुराव गव्हाणे हे अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी इतर तिघे गेले मात्र या मेणवलीमध्ये गॅस तयार होऊन चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये प्रकाश आटोळे, बाबुराव गव्हाणे, भानुदास आटोळे आणि त्यांचा मुलगा प्रवीण आटोळे यांचा समावेश आहे.

बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास खांडज गावाजवळ असलेल्या २२ फाट्याजवळ ही घटना घडली. मेणवलीत पडल्याने हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. चौघांनाही बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. तर एक जण अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे.

First published: