Home /News /pune /

पुण्यातील लग्न सोहळ्यात बारबालांचा धांगडधिंगा; पैसे उडवत तरुणांचाही अश्लील डान्स

पुण्यातील लग्न सोहळ्यात बारबालांचा धांगडधिंगा; पैसे उडवत तरुणांचाही अश्लील डान्स

Crime in Pune: पुण्यात कोरोना नियमांना हरताळ फासणारा लग्न सोहळा पार पडला आहे. येथील एका लग्न सोहळ्यात चक्क बारबाला नाचवल्याचा (Bar dancers dance in marriage) धक्कादायक प्रकार घडला आहे.

    पुणे, 22 फेब्रुवारी: मागील काही काळापासून पुण्यासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आलेख (Corona cases in Pune) घसरला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोरोना नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली आहे. अशात पुण्यात (Pune) कोरोना नियमांना हरताळ फासणारा लग्न सोहळा पार पडला आहे. येथील एका लग्न सोहळ्यात चक्क बारबाला नाचवल्याचा (Bar dancers dance in marriage) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ (Viral video) समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा संतापजनक प्रकार पुण्यातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या वडारवाडी परिसरात घडला आहे. या लग्नाला मोठ्या संख्येनं नागरिक हजर होते. घरासमोर टाकलेल्या मंडपात काही बारबाला नाचवल्या आहेत. लग्नासारख्या शुभ समारंभात अशाप्रकारे बारबाला नाचवल्याने परिसरात हा विवाह चर्चेचा विषय ठरला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर काही नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे. हेही वाचा-पुण्यातील मटका किंगचे मारेकरी गजाआड; हॉटेलच्या बिलामुळे उलगडलं गूढ संबंधित व्हिडीओत काही बाराबाला घरासमोरील मंडपात विचित्र हावभाव करत डान्स करताना दिसत आहेत. एवढंच नव्हे तर उपस्थित काही तरुण बारबालांसोबत हिडीस डान्स करत आहेत. यावेळी काहीजण बारबालांना पैसे देताना देखील दिसून आले आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होतं असून अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. हेही वाचा-अपरात्री चिमुकलीचं अपहरण करून शेतात लपला नराधम; शेतकऱ्यानं एकरभर उसाला लावली आग खरंतर, पुण्यासह मुंबईत ओमायक्रॉन व्हेरिएंटचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान रुग्णालेख घसरल्याने कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच लग्न संमारंभाच्या कार्यक्रमांना नागरिकांच्या उपस्थितीचे निर्बंध देखील हटवले आहेत. याचा काहीजण गैरफायदा घेताना दिसत आहेत. नागरिकांच्या अशाप्रकारच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सजग नागरिकांकडून संबंधित लग्नाबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या