जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
बारामती, 31 मार्च : बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वी कोयते गँगने धुडगूस घातल्याची घटना घडली होती. आज शहरामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबार करत सराफाचं दुकान लुटण्याचा प्रयत्न झाला. या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले आहे. पण एक दरोडेखोर पकडला गेला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील सुप्यामध्ये आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परप्रांतीय दरोडेखोरांकडून बस स्थानकाशेजारी असणाऱ्या सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. चार दरोडेखोर एकत्र येऊन गोळीबार करून नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात 2 स्थानिक नागरिकाला गोळी लागली आहे.
हा नागरिक जखमी झाला असून चिडलेल्या जमावाने दरोडेखोरांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक जण पोलीस आणि ग्रामस्थांच्या तावडीत सापडला असून इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
अधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील सुपे येथील महालक्ष्मीची ज्वेलर्स ज्वेलर्सवर आज अज्ञात चार व्यक्तींनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. पिस्तूलमधून गोळी झाडत हा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये स्थानिक दोन व्यक्ती जखमी झाले आहेत. महालक्ष्मी ज्वेलर्सचे शटर आतून बंद करत असताना चार अज्ञात व्यक्तीनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी गोळीबार केला. नागरिकांच्या प्रयत्नामुळे एका व्यक्तीस पकडण्यास यश आले असून इतर तीन व्यक्ती फरार झाले आहे.
पर राज्यातील टोळी ही सराफ दुकान लुटण्यासाठी बारामतीत आली असल्याची पोलिसांनी प्राथमिक अंदाज दर्शविला आहे. फरार झालेल्या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.