सुमित सोनवणे,दौंड, 23 नोव्हेंबर : अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. सुभाष अग्रवाल हे त्यांच्या मेडिकल स्टोअरमध्ये बसलेले असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गंभीर हल्ला केला आणि मेडिकल स्टोअरमधील रोख लुटली. काही दिवसांपूर्वी झालेल्या या भ्याड हल्ल्याचा पुणे जिल्हा भाजपचे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष स्वप्नील शहा यांनी तीव्र निषेध केला आहे.
आघाडी सरकारने व्यापाऱ्यांच्या सुरक्षितेची गांभीर्याने दखल घ्यावी व गुंड प्रवृत्तीच्या कृत्य करणाऱ्यांवर आळा घालून त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत स्वप्नील शहा यांनी दौंडचे नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्याकडे निवेदन दिले आहे.
'व्यापारी हा समाजातील शांतताप्रिय व प्रतिष्ठित असून त्यांच्यावर होणारे हल्ले निंदणीय आहेत. सध्या चोर्या, दरोडे, व्यापाऱ्यांवर हल्ले, गुंडगिरी अशा दहशतीमुळे संपूर्ण व्यापारी वर्ग धास्तावलेला आहे. दुर्दैवाने व्यापारी व बाजारपेठांना संरक्षण सुविधा देण्यामध्ये महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरत आहे,' असा आरोपही शहा यांनी केला आहे.
अकोल्यात नेमकं काय घडलं?
अकोला जिल्ह्यातल्या उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हातरून इथल्या भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर चोरट्यांकडून हल्ला करण्यात आला. या हल्यात सुभाष अग्रवाल जखमी झाले. मंगळवारी हातरुनला साप्ताहिक बाजार होता. त्या दरम्यान ही घटना घडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.