S M L

एकतर्फी प्रेमातून भाजप आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला

पुण्यात वणीचे आमदार संजय बोदकुलवार यांच्या मुलीवर प्राणघातक हल्ला. आरोपी राजेश कुमार बक्षी ताब्यात.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 3, 2017 04:35 PM IST

एकतर्फी प्रेमातून भाजप आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला

03 एप्रिल :   पिंपरी चिंचवडमधील वाकडमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे भाजपचे आमदार संजीव बोदकुरवार यांच्या मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ल्या इतका जीवघेणा होता की यामध्ये तरूणीचं बोटं तुटलं आहे.

पीडित तरूणी आणि प्राणघातक हल्ला करणारा विद्यार्थी हे दोघेही बालाजी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. राजेश बक्षी (वय 23) असं हल्ला करण्याऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो मुळचा हरियाणाचा आहे.

तरूणी सकाळी हॉस्टेलमधून महाविद्यालयात जात असताना राजेश बक्षीने तिचा पाठलाग करून तिच्यावर सत्तूर या धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. यामध्ये तिच्या डाव्या हाताची करंगळी तुटली.वाकडच्या बालाजी सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून संशयित आरोपी राजेश बक्षीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोप बक्षीवर सध्या गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

पीडित तरूणी बालाजी महाविद्यालयात एमबीएचं शिक्षण घेते. या तरूणीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 11:23 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close