पुणे, 05 जानेवारी : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांचा चुलत भाऊ शेखर पारगे याच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील सिंहगड पायथ्याशी गावाता घडली आहे.
या प्रकरणी हवेली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी मधील जिव्हाळा फार्महाऊसवर शेखर पारगे आपल्या मित्रांसह मद्यपान करत बसले होते. त्याच हॉटेलमध्ये डोणजे येथील काही तरुण मद्यपान व जेवणासाठी बसले होते.
Facebook Live सुरू करुन आत्महत्या करत होता; आयर्लंडच्या हेडक्वार्टरने दिला अलर्ट
मध्यरात्रीनंतर शेखर पारगे आणि इतर तरुणांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. राग अनावर झाल्यावर शाकीर शेख, सज्जद शेख व इतर दोघांनी डोणजे येथे जाऊन कोयते व सत्तुर घेऊन येत शेखर पारगे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये शेखर पारगे याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. शेखर पारगे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्ला झाल्यापासून चारही हल्लेखोर फरार झाले आहेत.
नव्या वर्षात व्हा फिट! OnePlus Band मध्ये मिळणार 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप
हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.
ग्रामपंचायत सदस्यपदी झाली होती बिनविरोध निवड
सध्या डोणजे ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून यामध्ये शेखर पारगे याची डोणजे ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, या हल्ल्यामागे ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.