पुण्यात मुख्यमंत्री, पवार आणि जेटली एकाच मंचावर

पुण्यात मुख्यमंत्री, पवार आणि जेटली एकाच मंचावर

पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अरुण जेटली आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका मंचावर आले होते. निमित्त होतं पुणे डीसीसी बँकेच्या शताब्दी सांगता सोहळ्याचं.

  • Share this:

पुणे, 10 सप्टेंबर : पुण्यामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अरुण जेटली आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका मंचावर आले होते. निमित्त होतं पुणे डीसीसी बँकेच्या शताब्दी सांगता सोहळ्याचं.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरून घेण्याचं समर्थन केलं. फक्त खऱ्या आणि गरजवंत शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळावा, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असं फडणवीस म्हणाले. तर अरुण जेटलींनी पुणे डीसीसी बँकेचं कौतुक केलं. या बँकेचं एनपीए शून्य आहे. एकही मोठं कर्ज बाकी नाही, ही अतिशय चांगली बाब आहे, असं जेटली म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2017 06:35 PM IST

ताज्या बातम्या