मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळाचे सरकार्यवाहक धनंजय दामले यांचं निधन; क्रीडा जगताचा होते आधारस्तंभ

पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळाचे सरकार्यवाहक धनंजय दामले यांचं निधन; क्रीडा जगताचा होते आधारस्तंभ

Pune news: आजोबा कै. शिवरामपंत दामले यांचा वारसा चालवणारे धनंजय दामले पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे आधारस्तंभ होते. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांच्या अकाली निधनामुळे क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

पुणे, 2 एप्रिल: महाराष्ट्रीय मंडळाचे सरकार्यवाहक धनंजय दामले यांचं शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झालं. वयाच्या 55 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनामुळे क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात त्यांच्या कामाची पोकळी निर्माण झाली आहे. सामाजिक,  शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दामले गेल्या 9 वर्षांपासून महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस म्हणून काम करत होते. सध्या ते पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष, पुणे जिल्हा जलतरण संघटना आणि जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम करत होते.

पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवास गेल्या 2 वर्षांपूर्वी रमणबाग येथे जागा उपलब्ध होत नव्हती. तेव्हा दामले यांनी पुढाकार घेत सवाई गंधर्व महोत्सवाचं आयोजन महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर झाला होता. 'चला मैदानावर' आणि 'रहा निरोगी' या दोन पुस्तकांसह क्रीडा विषयावर विपूल लेखन केले आहे.

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' चे पालन करण्यात मुख्यमंत्री नापास; नारायण राणेंचं टीकास्त्र

महाराष्ट्रीय मंडळातर्फे क्रीडा विभाग आणि शाळा यांची जबाबदारी धनंजय दामले यांच्याकडे होती. आजोबा कै. शिवरामपंत दामले आणि वडील रमेश दामले यांचा वारसा ते समर्थपणे चालवत होते. त्यांच्या मागे पत्नी नेहा, मुलगा रणजी क्रिकेटपटू रोहन दामले आणि एक बहीण असा परिवार आहे.

First published:
top videos

    Tags: Pune