Home /News /pune /

रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीला लावला अस्थींच्या राखेचा लेप; संशयित ताब्यात

रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीला लावला अस्थींच्या राखेचा लेप; संशयित ताब्यात

Crime News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगड येथील समाधीला काही जणांनी अस्थींच्या राखेचा लेप लावल्याचा (ashes of bones laid on tomb of Shivaji Maharaj) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    रायगड, 10 डिसेंबर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले रायगड येथील समाधीला काही जणांनी अस्थींच्या राखेचा लेप लावल्याचा (ashes of bones laid on tomb of Shivaji Maharaj) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी आरोपींनी एका पुस्तकाचं पूजन करत, काही मंत्रोच्चार केल्याचं देखील आरोपात म्हटलं आहे. रायगडावरील काही शिवप्रेमी लोकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी पुण्यातील काही लोकं किल्ले रायगडावर आले होते. येथील जगदीश्वर मंदिराजवळच्या चौथाऱ्यावर संबंधिंत आरोपींच्या काही संशयास्पद हालचाली सुरू होत्या. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने रायगडावरील काही शिवप्रेमींनी आरोपींचा पाठलाग केला आहे. संबंधित चार ते पाच संशयित जगदीश्वर मंदिराजवळील चौथाऱ्यावर मंत्रोच्चार करून शिवाजी महाराजांच्या समाधीला राखेचा लेप लावण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोपी फिर्यांदीकडून करण्यात आला आहे. हेही वाचा- ऐन दिवाळीत रायगडावर शिवभक्ताचा मृत्यू, पायऱ्या चढत असतानाच ह्रदयविकाराचा झटका लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित अस्थी मिश्रित लेपात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी यावेळी एका पुस्तकाचं पूजन देखील केलं आहे. पण ऐनवेळी हा संशयास्पद प्रकार लक्षात आल्यानंतर, शिवप्रेमी तरुणांनी त्यांना रोखलं आहे. त्यामुळे गडावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हेही वाचा- हृदयद्रावक! राजगडावर चढाई करताना मृत्यूनं गाठलं; पुण्यातील पर्यटकाचा दुर्दैवी अंत यानंतर काही जणांची या घटनेची माहिती महाड पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पण आरोपींनी असा काहीच प्रकार केला नसल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून राख मिश्रित लेप ताब्यात घेतला असून रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या