• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • BREAKING : फरार किरण गोसावीचा लागला ठावठिकाणा, युपीच्या लखनौमध्ये बसला लपून!

BREAKING : फरार किरण गोसावीचा लागला ठावठिकाणा, युपीच्या लखनौमध्ये बसला लपून!

गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला पंच किरण गोसावीचा (Kiran Gosavi) ठावठिकाणा लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला पंच किरण गोसावीचा (Kiran Gosavi) ठावठिकाणा लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला पंच किरण गोसावीचा (Kiran Gosavi) ठावठिकाणा लागला आहे.

  • Share this:
पुणे, 25 ऑक्टोबर : आर्यन खान अटक प्रकरणाला (aryan Khan arrest case)आता नवे वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला पंच किरण गोसावीचा (Kiran Gosavi) ठावठिकाणा लागला आहे. किरण गोसावी हा उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) लखनौमध्ये ( lakhnau) लपून बसला असल्याची माहिती समोर आली आहे. किरण गोसावीवर आधीच पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहे. त्यानंतर अखेर किरण गोसावीचा पत्ता लागला आहे. दोनच दिवसांपूर्वी पंच प्रभाकर साईल याने किरण गोसावीवर आर्यन खान अटक प्रकरणात 25 कोटींची लाच मागितली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली. अखेर या प्रकरणी किरण गोसावी याने CNN news 18 शी संवाद साधून सर्व आरोप फेटाळून लावले. किरण गोसावी हा सध्या उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये मुक्कामी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अरे बापरे! कांद्यामुळे होतोय नवा साल्मोनेला आजार; जाणून घ्या लक्षणं आणि उपचार  राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आरोपांची मालिका सुरू केल्यानंतर किरण गोसावी हा फरार झाला होता. एवढंच नाहीतर तो दिल्लीत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. पण, अखेर किरण गोसावी हा उत्तर प्रदेशमध्ये जाऊन लपलेला असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, किरण गोसावीवर याआधीच पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर किरण गोसावी हा फरार आरोपी असल्याची नोंद आहे. याआधीही सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र असा सामना रंगला होता. त्यामुळे किरण गोसावीला ताब्यात घेण्यावरून केंद्र पातळीवर वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. दरम्यान  किरण गोसावीने क्रुझवर कशा प्रकारे कारवाई केली होती आणि प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांना CNN News 18 शी बोलताना खुलासा केला आहे. नोकरी करून दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; Time Management पाहून थक्क व्हाल! 'क्रुझवर जेव्हा कारवाई करण्यात आली होती, त्याआधी मला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार मी एनसीबीला माहिती दिली होती. त्यानंतर क्रुझवर कारवाई करण्यात आली होती. आर्यन खानसोबत जो सेल्फी काढला होता, तो सेल्फी एनसीबीच्या ऑफिसमध्ये काढला नव्हता तर तो क्रुझवर काढला होता, असा दावाही गोसावी याने केला आहे. त्याचबरोबर प्रभाकर साईल याने 25 कोटींच्या खंडणीचे केले आरोप हे निराधार आहे. मी कोणतीही खंडणी मागितली नाही. शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी कधीही भेट झाली नाही, त्यामुळे अशी कोणतीही खंडणी मागितली नव्हती, असा दावाही त्याने केला.

मागवला आयफोन, आला साबण! पण ग्राहक ठरला चोरावर मोर

'माझ्या जीवाला धोका आहे, आर्यन खानला अटक केल्यानंतर  3 ऑक्टोबरनंतर अनेक खंडणीचे कॉल आले. त्यावर सध्या राजकारण सुरू आहे, माझ्या जीवा धोका असून पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार आहे, असंही किरण गोसावी म्हणाला.
Published by:sachin Salve
First published: