बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाचा वाद पेटला

बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाचा वाद पेटला

पुण्यातल्या प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर या नाट्यगृहाच्या पुनर्विकासाच्या घोषणेने कलाकारांच्या पोटात गोळा उठलाय. सरकारी पुनर्विकासाच्या नावाखाली नाट्यगृहाचं गणित बिघडू नये अशी कलाकारांची मागणी आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, 04 मार्च : पुण्यातल्या प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिर या नाट्यगृहाच्या पुनर्विकासाच्या घोषणेने कलाकारांच्या पोटात गोळा उठलाय. सरकारी पुनर्विकासाच्या नावाखाली नाट्यगृहाचं गणित बिघडू नये अशी कलाकारांची मागणी आहे.

पन्नास वर्षं जुन्या बालगंधर्व रंगमंदिराला बदलून टाकायची भूमिका पुण्यातल्या मनपाच्या राजकारण्यांची आहे. आताच्या नाट्यगृहाच्या जागी अत्याधुनिक वास्तू उभी करणे, सोबत आणखी एक छोटं नाट्यगृह आणि काही कलादालनं उभी करणे अशी स्थायी समिती अध्यक्षांची संकल्पना आहे. कलाकारांना मात्र हा प्रकार रुचत नाहीए.

कलाकारांना भीती आहे वाढत्या सरकारी हस्तक्षेपाची आणि त्यातून नाट्यगृहांच्या अव्यवस्थेची. महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरणे असल्याचं रंगकर्मी सांगतात. राजकारण्यांना मात्र ही भीती निराधार वाटते.

पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. इथं दिवंगत साहित्यिक पु.ल देशपांडे यांच्या कल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिर साकारलं गेलं. त्याचं नवं रुपडं बनवण्याची गरज आत्ता आहे का हा सवाल उरतोच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 4, 2018 10:17 AM IST

ताज्या बातम्या