पुणे, 09 ऑगस्ट : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि धुळे या शहरांमध्ये बंद पुकारण्यात आलेला नाही. दरम्यान पुण्याच्या चाकणमध्ये मागील आंदोलन चिघळलं होतं. त्यामुळे आज आंदोलकांवर करडी नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमे-याचा वापर करण्यात येत आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाला हिंसक वळण न लागावं यासाठी पोलिसांकडून सुरक्षेची पाऊलं उचलण्य़ात येत आहेत.