दाभोलकर खून प्रकरणी 'सनातन'चा साधक ताब्यात

दाभोलकर खून प्रकरणी 'सनातन'चा साधक ताब्यात

  • Share this:

narendra dabholkar28 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी गोव्यातून सनातन प्रभात संस्थेच्या आश्रमातून एका साधकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. संदीप शिंदे असं या साधकाचं नाव आहे. त्याला चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलंय अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

सनातन संस्थेच्या रामनाथी येथील आश्रमातून संदीप शिंदे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. पुणे पोलीस तपास पथकाच्या प्रमुख गीता भगवाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केलीय. यावेळी सनातनचे विश्वस्त विरेंद्र मराठे तसंच सनातनाचे वकील ऍड. ताकभाते उपस्थित होते. संदीप शिंदे गेली चार वर्षे रामनाथी आश्रमात साधना करत होता. तो मुळचा पुण्याचा आहे. पोलिसांनी अधिक चौकशीसाठी संदीपला पुण्याला आणलं आहे.

दाभोळकर यांची सुपारी देऊन खून करण्यात आला आहे असा संशय पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केला. तसंच गुन्हा करताना अत्यंत खबरदारी घेण्यात आली कोणताही पुरावा हाती लागू नये याची दक्षता हल्लेखोरांनी घेतली असंही पोळ यांनी सांगितलं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला एक आठवडा पूर्ण झालाय. पण अजूनही कोणताच ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

 

Loading...

डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास कुठपर्यंत आला आहे, याची माहिती घेण्यासाठी दाभोलकरांची मुलगी मुक्ता आणि मुलगा हमीद यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मात्र खुनाबाबत तपास सुरू आहे, अजूनही ठोस माहिती आलेली नाही, असंही गुलाबराव पोळ यांनी सांगितलं. हल्लेखोर ज्या दुचाकीवरून आले होते त्यानंबरच्या आतापर्यंत 74 गाड्या तपासलेल्या आहेत.110 सीसीटीव्ही फुटेज आहे त्यातलं 50 बघून झालंय. मॉर्निंग वॉकला येणार्‍या 96 प्रत्यक्षदर्शींना विचारपूस केली. मात्र एकाकडून आवश्यक माहिती मिळू शकली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

तपास कुठपर्यंत?

- पुणे पासिंगच्या 7746 या नंबरच्या 74 गाड्या तपासल्या

- 110 सीसीटीव्ही फूटेजपैकी 50 फूटेज बघितले

- मॉर्निंग वॉकला येणार्‍या 96 प्रत्यक्षदर्शींची विचारपूस

- गाडी डुप्लिकेट नंबर प्लेटची आहे का याची चौकशी सुरू

- सुपारी किलर्सचा रेकॉर्ड मागवला

- पुण्यातल्या 200 आणि इतर ठिकाणच्या 700 गुन्हेगारांचे रेकॉर्ड्स मागवलेत

पुणे पोलिसांचं आवाहन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणी कोणतीही माहिती असल्यास संपर्क साधा

पुणे पोलीस - 020-26112222 किंवा 26208295 आपली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2013 10:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...