S M L

पुण्यातही जात पंचायतीचा प्रकार उघड

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2013 04:14 PM IST

jaat panchyat411 जुलै : सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुण्यातही नाशिक प्रमाणे जात पंचायतीचा प्रकार उघडकीस आलाय. श्रीगौड ब्राम्हण समाजातल्या सात कुटुंबांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिलीय. आंतरजातीय विवाह केल्यामुळे या कुटुंबांना बहिष्कृत करण्यात आलं आहे. या नंतर कुठल्याही समारंभांना या कुटुंबाना प्रवेश बंद होता.

 

त्याच बरोबर अनेक वेळा धक्काबुक्की आणि दमदाटी चे प्रकारही करण्यात आले होते. या कुटुंबीयांना दंड भरण्याची जबरदस्ती करण्यात आली होती. त्याच बरोबर त्यांच्याकडे कुणी गेलं तर त्यांना देखील बहिष्कृत करण्यात येईल असा फतवाच या जात पंचायतीनं काढला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आलीय. तर इतर पंच फरार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2013 02:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close